
आईसह दोन मुलींना वाचवणाऱ्या डोंगरे यांचा आजऱ्यात सत्कार
19172
राजश्री डोंगरे
आईसह दोन मुलींना वाचवणाऱ्या
डोंगरे यांचा आजऱ्यात सत्कार
आजरा, ता. ३ ः येथील हिरण्यकेशी घाटावर आईसह दोन मुलींना बुडताना राजश्री डोंगरे यांनी वाचवले. शनिवारी (ता. २९) दुपारी तीनच्या सुमाराला ही घटना घडली. राजश्री डोंगरे यांचे त्यांच्या धाडसाबद्दल कौतुक करत येथील मराठा महासंघातर्फे सत्कार केला.
डोंगरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शनिवारी महिला धुणे धुण्यासाठी नदीघाटावर गेल्या होत्या. या वेळी प्रियांका पोवार या कपडे धुत होत्या. त्यांच्याबरोबर आर्या व पूजा या दोन मुली होत्या. त्या मुली नदी काठावर खेळताना पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी प्रियांका पोवार यांनी नदीत उडी घेतली. त्यावेळी आरडाओरड झाली. या वेळी प्रसंगावधान राखत राजश्री डोंगरे यांनी नऊवारी साडी पोवार यांच्याकडे टाकली. त्या दोन मुली व पोवार यांना साडीला धरण्यास सांगितले. डोंगरे यांनी साडी पाण्याबाहेर ओढण्यास सुरुवात करताच अन्य महिलाही त्यांच्या मदतीला धावल्या. त्यांनी त्या दोन मुली व आईला पाण्याबाहेर काढून जीव वाचवला. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक करून सत्कार केला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54851 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..