यंदा इचलकरंजी फेस्टीव्हल करण्याचा बैठकीत निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा इचलकरंजी फेस्टीव्हल करण्याचा बैठकीत निर्णय
यंदा इचलकरंजी फेस्टीव्हल करण्याचा बैठकीत निर्णय

यंदा इचलकरंजी फेस्टीव्हल करण्याचा बैठकीत निर्णय

sakal_logo
By

यंदा इचलकरंजी फेस्‍टिव्हल
करण्याचा बैठकीत निर्णय
इचलकरंजी, ता. ४ ः उदयोन्मुख कलाकारांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा या हेतूने सुरू करण्यात आलेले इचलकरंजी फेस्‍टिव्हल यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. अध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे व कार्याध्यक्ष अहमद मुजावार व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुणे फेस्‍टिव्हलच्या धर्तीवर २२ वर्षांपूर्वी इचलकरंजी फे व्हल ची सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून शहर व परिसरातील उदयोन्मुख कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले आहे. या ठिकाणी कला सादर केलेल्या अनेक कलाकारांनी आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराचा नावलौकिक केला आहे. मागील दोन वर्षे कोरोना महामारीच्या संकटामुळे शासन निर्बंध घातले होते. त्यामुळे फेस्‍टिव्हल भरवता आले नाही. आता निर्बंध हटले असून यंदा इचलकरंजी फेस्‍टिव्हल मोठ्या उत्साहात आणि दणक्यात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी प्रकाश दत्तवाडे, शेखर शहा, बाळासाहेब कलागते आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54863 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top