राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघ विजेता
राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघ विजेता

राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघ विजेता

sakal_logo
By

19250
इचलकरंजी ः राज्यस्तरीय सीनियर रोल बॉल स्पर्धेतील विजेत्या मुलींच्या जिल्हा संघाला चषक देताना संदीप खर्डेकर व अन्य.

राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत
कोल्हापूर जिल्हा संघ विजेता
इचलकरंजी, ता. ४ ः पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय सीनियर रोल बॉल स्पर्धेत मुलींच्या कोल्हापूर जिल्हा संघाला विजेतेपद मिळाले. महाराष्ट्र रोल बॉल संघटना आणि पुणे जिल्हा रोल बॉल संघटना यांच्यातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, नंदूरबार, नाशिक, जळगाव, धुळे, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, पुणे आदी जिल्ह्यांतील  मुले व मुलींच्या संघांनी सहभाग घेतला होता.
मुलींच्या गटात कोल्हापूर संघाने सोलापूर, नाशिक या संघांवर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत ठाणे संघावर मात केली. अंतिम सामना पुणे विरुद्ध कोल्हापूर या दोन संघांमध्ये झाला. यामध्ये कोल्हापूरच्या अपूर्वा पाटील हिने एकमेव गोल करून कोल्हापूर संघाला विजय मिळवून दिला. संघामध्ये गौरी कदम, ऋतुजा रावळ, स्नेहल पाटील, प्रगती आरोटे, अपूर्वा पाटील, वैभवी मुदगल, पल्लवी लिगाडे, अक्षता शिकलगार, अपर्णा महाडिक, पूजा कुंभार यांचा समावेश होता.
---------------
चौकट
मुलांचा संघ उपविजेता
मुलांच्या गटात कोल्हापूर संघाने अकोला, बीड व यवतमाळ या संघांवर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत नाशिक, तर उपांत्य फेरीत जळगाव संघावर मात करून संघ अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम सामना पुणे आणि कोल्हापूर यांच्यामध्ये झाला. हा अत्यंत चुरशीने खेळला गेलेला अंतिम सामना पुणे संघाने ६-४ असा जिंकला. मुलांच्या संघात रोनक कणसे, आदित्य सुतार, संकेत हारगे, श्रीधर सोनार, प्रतीक कत्ते, प्रदीप पुनिया, आदित्य मगदूम, प्रथमेश कित्तुरे, आदित्य उकले, गुरू पाटील, गौरव कदम, कमलकिशोर जोशी यांचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54866 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top