
गडहिंग्लज एसटी आगारामध्ये संघटना विरहित कर्मचारी समिती
GAD42.JPG
गडहिंग्लज : राज्य परिवहन कष्टकरी कर्मचारी समितीतर्फे राजेश माटले यांना निवेदन देताना अमोल तांबेकर, सचिन मगदूम, श्रीधर कांबळे, एस. के. सुतार आदी.
गडहिंग्लज एसटी आगारामध्ये
संघटनाविरहित कर्मचारी समिती
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) येथील आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत राज्य परिवहन कष्टकरी कर्मचारी समितीची स्थापना केली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीवरून ही संघटनाविरहित समिती स्थापन झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ही समिती कार्यरत राहणार आहे. या समितीला सहकार्य करण्याबाबतचे निवेदन आगारप्रमुखांना देण्यात आले.
येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी संप मागे घेताना समितीची घोषणा केली होती. त्याच्या विस्तारीकरणासह पूर्ण स्वरूप देण्यात आले आहे. सचिन मगदूम (अध्यक्ष), श्रीधर कांबळे, एस. के. सुतार (उपाध्यक्ष), अमोल तांबेकर (डेपो सेक्रेटरी), जी. व्ही. विचारे, एस. टी. पाटील (सहसचिव), एस. व्ही. डोंगरे, आर. ए. रोकडे, संतोष कांबळे, एम. ए. शेट्टी (संघटक सचिव), सुनील पाटील (खजिनदार), विनोद शिंदे (सहखजिनदार), एन. एस. गवळी (कार्याध्यक्ष), अंकुश कांबळे, अल्लाबक्ष मुल्लाणी, रवी कोळी (उपकार्याध्यक्ष) यांच्यासह प्रसिद्धी सचिव, विभागीय महिला सदस्य, महिला संघटक सचिव, महिला संघटक, प्रमुख सल्लागार, विभागीय सदस्य या पदावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान, आगारप्रमुखांच्या नावे असलेले निवेदन स्थानकप्रमुख राजेश माटले यांनी स्वीकारले. आगारातील दैनंदिन प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकारिणीस सहकार्य करावे, अशी विनंती या निवेदनातून केली आहे. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54874 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..