
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
19257
गडहिंग्लज : राजे शिवछत्रपती चौकाच्या नामकरण प्रसंगी नितीन देसाई, सुनील चव्हाण आदी.
गडहिंग्लजला चौकाचे नामकरण
गडहिंग्लज : येथील आजरा रोडवरील चौकाचे राजे शिवछत्रपती चौक असे नामकरण करण्यात आले. शिवजयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम झाला. माजी नगरसेवक नितीन देसाई यांच्या हस्ते चौकाच्या नामफलकाचे अनावरण झाले. नंदकुमार शेळके, शशिकांत मोहिते, चौगुले, बळवंत सुतार, सुनील चव्हाण, बंटी चव्हाण, व्हिक्टर बारदेस्कर यांच्यासह राजे ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
------------------------
19258
गडहिंग्लज : माजी सैनिकांच्या मेळाव्याप्रसंगी मुरलीधर देसाई यांचा सत्कार करताना बसगोंडा पाटील.
माजी सैनिकांचा मेळावा उत्साहात
गडहिंग्लज : येथील माजी सैनिकांचा मेळावा उत्साहात झाला. माजी सैनिक मुरलीधर देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याचे आयोजक माजी सैनिक बसगोंडा पाटील यांनी प्रास्ताविक केले. देसाई म्हणाले, ‘‘जीवाची पर्वा न करता सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना निवृत्तीनंतर समाजात सन्मानाने जगता आले पाहिजे. त्याला परक्याची वागणूक देऊ नये. लोकशाही प्रक्रियेत त्याला सामावून घ्यावे.’’ वसंत पाटील, तिपान्ना कोटगी, कुमार पाटील, प्रकाश बेटगर, बसवराज सोलापूरे, शिवाजी सोले, तानाजी बिद्रेवाडी, कलाप्पा किल्लेदार, अजित केसरकर, के. एम. केरवाल, स्मिता पाटील आदी उपस्थित होते.
-----------------------------
19259
गडहिंग्लज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व येथील जनकल्याण समितीतर्फे रुग्णोपयोगी साहित्य केंद्राच्या प्रारंभ प्रसंगी स्मिता गंभीर, डॉ. रणजित कदम, डॉ. बालाजी साळुंखे, अमर पारगावकर आदी.
रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचा प्रारंभ
गडहिंग्लज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व येथील जनकल्याण समितीतर्फे बाजार समितीजवळ रुग्णोपयोगी साहित्य केंद्राची सुरुवात करण्यात आली. स्मिता गंभीर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. रणजित कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. डॉ. बालाजी साळुंखे यांच्या हस्ते साहित्याची पूजा झाली. अमर पारगावकर यांनी प्रास्ताविक केले. उपचारानंतर रुग्ण घरी जातो. पण, त्याला अनेक साधनांची गरज लागते. त्यासाठी रुग्णांना खर्च करावा लागतो. तो खर्च कमी व्हावा म्हणून नाममात्र भाडेतत्त्वावर साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे पारगावकर यांनी सांगितले. योगेश शहा, जोतिबा पाटील, मनोज पवार, प्रवीण पाटील, बाळासाहेब कुलकर्णी, सुभाष सप्रे, अतुल कुलकर्णी, शशिकांत कुलकर्णी, प्रितम कापसे, राजेंद्र तारळे, यशवंत कुलकर्णी, जयवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते. संजय कुलकर्णी यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54878 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..