चोरटे जोमात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरटे जोमात...
चोरटे जोमात...

चोरटे जोमात...

sakal_logo
By

चोरटे कार्टुन

शहर परिसरात चोरट्यांची दहशत...

बंद घरांसह जनावरांवरही डोळा ; पोलिस असल्याचीही बतावणीचा फंडा

राजेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः उन्हाळी सुट्टी आहे म्हणून घराला कुलूप लावून बाहेरगावी जाताय तर सावधान... असे म्हणण्याची वेळ आली आहे. गेल्या दीड महिन्यात शहर परिसरात चोरटे सक्रीय झाले आहेत. चोरटे केवळ बंद घरांवरच नव्हे तर जनावरांवरांनाही लक्ष्य करू लागले आहेत. पोलिस असल्याची बतावणीने केली जाणारी लूट सर्वसामान्यांच्यात धास्ती निर्माण करत आहे.

दीड महिन्यापासून चोरट्यांनी डोकेवर काढले आहे. शहर परिसरात घरफोडी, वाहन चोरीसह प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्याचबरोबर जनावरे चोरण्याचेही प्रकारही घडू लागलेत. ताराबाई पार्क येथील बंद फ्लॅट चोरट्याने भरदिवसा फोडून त्यातील रोकडसह दागिने असा एक लाखांचा ऐवज लंपास केला. आराम कॉर्नर येथील बंद दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्याने ७० हजाराहून अधिकचा ऐवज लंपास केला. भुयेवाडी भागातील एका घरात शिरलेल्या तिघा लुटारूंनी ८१ हजाराचा ऐवजावर डल्ला मारला. प्रतिभानगरातील बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून त्यातील टीव्ही, सिलिंडर चोरून नेले. त्यापाठोपाठ रूईकर कॉलनी, बोंद्रेनगर, नागदेवाडी येथील बंद घरांवर निशाणा साधत चोरट्यांनी लाखोंचा किमंती ऐवज लंपास केल्या असल्याच्या नोंदी रेकॉर्डवर आल्या आहेत. दरम्यान शालिनी पॅलेस परिसरात भरदिवसा दोघा भामट्यांनी वृद्धाला पोलिस असल्याचे सांगून त्यांचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याचा प्रकार घडला.
सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम असून अनेक जण पर्यटनासाठी, नातेवाईकांकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पण वाढत्या घरफोड्यांमुळे घराला कुलूप लावताना सर्वसमान्यांना धास्ती वाटू लागली आहे. यंत्रणेसमोर बंद घराच्या सुरक्षीततेच्या जबाबदारीसह चोरट्यांच्या वेळीच मुसक्या आवळण्याचे आव्हान उभे आहे.


जनावरेही लक्ष्य...
महिन्याभरात टाकाळा परिसरातून चोरट्याने दोन गायी चोरून नेल्याचा प्रकार घडला. त्यापाठोपाठ शाहूपुरी भाजी मंडई परिसरातून चौघा अज्ञातानी भरदिवसा एक गाय टेंपोतून चोरून नेल्याची नोंद रेकॉर्डवर आली. या प्रकारावरून चोरट्यांचे वाढलेले धाडस दिसून येते.

पैसे पडल्याचे सांगून लुट...
जोतिबा रोड आणि शाहूपुरी परिसरात महिन्याभरापूर्वी एकाच दिवशी पैसे पडल्याचे सांगून मोटारीत बसलेल्यांचे लक्ष्य विचलित करून त्याला बाहेर येण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर मोटारीतील मोबाईल संच रोकडवर चोरट्यानी डल्ला मारला गेला. यामधील एक सीसी टीव्हीतही कैद झाला होता.

----------
गुन्ह्यांचा प्रकार २०२० २०२१
दाखल उघड दाखल उघड
----------------------------------------------------------
दरोडा १० १० ११ ११
घरफोडी २६७ ९६ २९२ ७९
जबरी चोरी १०३ ८३ १२१ ७९
इतर चोऱ्या ७५५ २५३ १४१४ ४३२
-------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54936 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top