चंद्रकांत पाटील प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील प्रेस
चंद्रकांत पाटील प्रेस

चंद्रकांत पाटील प्रेस

sakal_logo
By

आघाडीकडून ओबीसी समाजाची फसवणूक
प्रदेशाध्यक्ष पाटील; भाजप २७ टक्के आरक्षणानुसार ओबीसींना उमेदवारी देणार
कोल्हापूर, ता. ४ ः ‘महाविकास आघाडी सरकारने निवडणूक आयोगाचे अधिकार घेण्याचा न टिकणारा कायदा केला. दोन वर्षे राजकीय आरक्षण देणार असे सांगत कणभरही काम केले नाही. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाविना निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. आघाडीच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले असून, ओबीसी समाजाची फसवणूक झाली. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, ‘दोन वर्षे ओबीसी समाजाला आरक्षणाचे लॉलीपॉप दाखवले. वेगळा आयोग, इम्पेरिकल डाटा ही कामे केली नाहीत. राज्यात प्रशासकांच्या जीवावर काम केले जात आहे. त्यामुळे ओबीसींचे नुकसान झाले आहे. भाजप ओबीसी समाजाला न्याय देणार आहे. २७ टक्के ओबीसी आरक्षण लक्षात घेऊन २७ टक्के ओबीसींना उमेदवारी देणार आहे.’
भोंग्यांबाबत पाटील म्हणाले, ‘राम जन्मभूमीचा तिढा मुस्लिम समाजाने सकारात्मक भूमिकेतून कोर्टाचा निर्णय मानून सोपा केला. यावेळीही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मशिदीवरील भोंगे काढण्याचे आवाहन संभाजीनगरचे मुस्लिम समाजाचे खासदार इम्तियाज करतात. प्रशासन मात्र परवानगी घेऊन भोंगे लावा, असे सांगत आहे. राज्यकर्ते कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत. त्यावेळी त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी संघर्ष, आंदोलन करावे लागतात. आम्ही शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. राज ठाकरे यांचाही भोंगा हा मुद्दा नसून वाढत्या ध्रुवीकरणाचा, दोघांना वेगळा न्याय देण्याचा आहे. त्यानुसार भोंगा नव्हे आणखी भरपूर गोष्टी असून त्या आपोआप येतील. राज्यकर्त्यांना ध्रुवीकरण करून मते मिळतात हे माहिती आहे. मुस्‍लिम समाजही कधी कधी ते दाखवून देतो. त्याचा मुस्लिम समाजाला तोटाच आहे. ते समजल्याने मुस्लिम समाज काँग्रेसच्या ध्रुवीकरणाला आता भीक घालत नाही.’

सरकारलाच वाटते दंगे व्हावेत
९५ टक्के मुसलमान देशातील विचारधारेशी जोडले आहेत. फक्त पाच टक्क्यांनाच निष्ठा पाकिस्तानात असायला हव्यात असे वाटते. त्यामुळे मुस्लिम समाजाने भोंगे उतरवून समजूतदारपणा दाखवला आहे. मात्र, हे सरकार जाती-जातीत, धर्मा-धर्मात फूट पाडून स्वतःची पोळी भाजण्यासाठी दडपशाही करत आहे. दंगे व्हावेत असे, त्यांना वाटते. मुस्लिम समाजाला खूश करण्याचा सरकारचा चाललेला प्रयत्न मुसलमान स्वीकारणार नाहीत, असेही पाटील यांनी सुनावले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54944 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top