
मनपातर्फे स्वच्छता
19368
महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता मोहीम
शाहू महाराज स्मृतिशताद्बीनिमित्त आयोजन; एक टन कचरा, प्लास्टिक जमा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताद्बीनिमित्त महापालिकेने विविध स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने शहरात स्वच्छता मोहीम राबविली. प्रेक्षणीय स्थळे, वारसा स्थळे, मुख्य रस्ते, चौकांची स्वच्छता केली. यात एक टन कचरा व प्लास्टिक जमा झाले. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनखाली स्वच्छता मोहीम राबविली.
पंचगंगा नदी घाट, अंबाबाई मंदिर, कोटीतीर्थ तलाव, खासबाग मैदान, न्यू पॅलेस, गांधी मैदान, शाहू समाधीस्थळ, छत्रपती शिवाजी विद्यापीठ मेनरोड,
रंकाळा परिसर, मध्यवर्ती बस स्थानक ते रेल्वे स्टेशन व टेंबलाई मंदिर येथे मोहीम राबविली. शाहू समाधीस्थळ, रंकाळा टॉवर व पंचगंगा नदी घाट परिसर
या ठिकाणी फिरती केली, स्वयंसेवी संस्थांसमवेत स्वच्छता केली. दोन जेसीबी, दोन डंपर, चार ट्रॅक्टर ट्रॉली व दोन पाणी टँकरचा वापर केला.
उपायुक्त रविकांत आडसूळ, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता रमेश मस्कर, नारायण भोसले, बाबूराव दबडे, नगरसचिव सुनील बिद्रे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, अर्थ वॉरियर्सचे ललित गांधी व सदस्य, व्हाईट आर्मीचे जवान, थुंकीमुक्त कोल्हापूरचे राहुल राजशेखर व सदस्य, वृक्षप्रेमी वेल्फेअरचे अमोल बुढ्ढे, अक्षय कांबळे व सदस्य, स्वच्छतादूत अमित देशपांडे, क्रेडाई संस्थेचे विद्यानंद बेडेकर व सदस्य, स्वरा फाउंडेशनचे प्रमोद माजगावकर व सदस्य, शिवाजी विद्यापीठ डिओटीचे प्रा. अमोल कुलकर्णी व विद्यार्थी, शेल्टर असोसिएशनचे सदस्य तसेच महापालिकेच्या विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
आज येथे मोहीम
गुरुवारी (ता. ५) सकाळी सात वाजता रंकाळा टॉवर ते फुलेवाडी पेट्रोल पंप परिसर, सीपीआर चौक ते व्हिनस कॉर्नर, शाहू मिल चौक ते सायबर चौक, इंदिरा सागर हॉटेल ते कळंबा जेल, डिएसपी चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, रंकाळा टॉवर ते तांबट कमान, पंचगंगा नदी रोड ते पंचगंगा घाट परिसर, शेंडा पार्क ते सायबर चौक, इंदिरा सागर हॉटेल ते तलवार चौक, व्हिनस कॉर्नर ते मध्यवर्ती बस स्थानक, कावळा नाका ते शिरोली जकात नाका येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54984 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..