
पोलिस वृत्त
००५३१
वृद्धाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
प्रयाग चिखली ः सोनतळी (ता. करवीर) येथील निशिकांत दत्तात्रय कुराडे (वय ६०) यांनी आजारास कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. करवीर पोलिस ठाण्याचे विजय भिवटे यांनी पंचनामा केला. कुराडे यांना मधुमेहाचा त्रास होता. अदरम्यान त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ते अस्वस्थ होते. आजाराला कंटाळून आज पहाटे त्यांनी सोनतळी- निगवे दरम्यानच्या एका विहिरीमध्ये आत्महत्या केली. विहिरीच्या काठावर चप्पल व इतर साहित्य आढळले. कुटुंबीयांना संशय आल्यामुळे शोधाशोध केली. जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी मृतदेह बाहेर काढला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ५) आहे.
अपघातात तरुण जखमी
कोल्हापूर : मिरजकर तिकटी येथे काल रात्री झालेल्या मोटारसायकल अपघातात तरूण जखमी झाला. अजय पोलादे (वय २३) असे त्यांचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
मारहाणीत वृद्ध जखमी
कोल्हापूर : वेतवडे (ता. गगनबावडा) येथे काल झालेल्या मारहाणीत वृद्ध व्यक्ती जखमी झाली. दत्तू लक्ष्मण शिंदे (वय ८४) असे त्यांचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
मोटारसायकल घसरून तरूण जखमी
कोल्हापूर : फुलेवाडी परिसरात मोटारसायकल घसरुन झालेल्या अपघातात तरूण जखमी झाला. प्रमोद कांबळे (वय २५) असे त्यांचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
ग्रायंडर लागून एकजण जखमी
कोल्हापूर : म्हसवे (ता. भूदरगड) येथे फॅब्रिकेशनचे काम करताना ग्रायंडर हाताला लागून एक जण जखमी झाला. संजय दिनकर मोरे (वय ४०) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
तरूणास मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा
कोल्हापूर, ता. ४ ः तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून तरुणास रॉडने केलेल्या मारहाण प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तिघा संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला. ओमकार प्रदीप पाटील, बिपीन देवणे आणि स्वप्नील मछींद्रनाथ पाथरूट अशी त्या तिघा संशयितांची नावे आहे. संभाजीनगर एसटी स्टँन्डच्या पिछाडीस माळात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. अशी फिर्याद जखमी विपुल सतिश पाटील यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55014 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..