
कागल : महात्मा बसवेश्वर जयंती
कागल : महात्मा बसवेश्वर जयंती
कागल, ता. ३: महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. येथील बसस्थानकाजवळ या मिरवणुकीची सुरुवात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पूजनाने झाली. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, राजू पाटील, सुनिल माळी, संजय ठाणेकर, अमित पिष्टे, बाबुराव पुंडे, योगेश गाताडे, प्रकाश माळी, सनी जकाते, प्रकाश पाटील, प्रकाश माळी आदी उपस्थित होते.
Kgl42.jpg
कागल: महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या भव्य मिरवणुक शुभारंभ प्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
घोटवडेत वंचित शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन
माजगाव ता.४ बातमीदार
घोटवडे (ता.पन्हाळा) येथे वंचित शेतकरी संघटनेच्या ७५ व्या शाखेचे उद्घाटन झाले . शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.संघटना प्रमुख प्रा.बाजीराव पाटील व जिल्हा अध्यक्ष उदयसिंह पाटील व वंचित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
प्रा.बाजीराव पाटील यांनी सर्व घटकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहू असे प्रतिपादन केले. राधानगरी शाहूवाडी गगनबावडा करवीर तालुक्यातील आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सत्कार झाला.
यावेळी मधुकर कांबळे राधानगरी तालुका प्रमुख,एम डी पाटील, भगवान सुतार ,पी जी बोळावे, प्रताप मीसाळ,सौरभ जरग, युवराज पाटील, भिमराव कांबळे, प्रकाश बल्लाळ,केशव कांबळे, बापूसाहेब चांदणे,बाबासो चीले,बाबासो यादव, सर्जेराव बनसोडे, जयसिंग कांबळे,दगडु कांबळे, आनंदा कांबळे, देवानंद पाटील, सुनिल पाटील, नम्रता मीसाळ, उज्वला पाटील,लक्ष्मी पाटील,आनंदी गुरव ,कमल कांबळे, यशोदा कांबळे, ॲड मनीषा पाटील सातापा कांबळे शिवाजी पासार्डे, मारूती सुपेकर, बाळासाहेब पाटील आदी व महीला पदाधिकारी म उपस्थित होत्या.
फोटो ओळ:- घोटवडेत वंचित शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन प्रसंगीप्रा.बाजीराव पाटील, उदयसिंह पाटील आदी
सिद्धनेर्ली, ता.४ः येथे शुक्रवारी(ता.६)रोजी शासन आपल्या दारीउपक्रमा अंतर्गत महा राजस्व अभियान राबवण्यात येणार आहे.सिद्धनेर्ली मंडळ अंतर्गत नऊ गावातील नागरिकांनी याचा फायदा घ्यावा .असे आवाहन सरपंच दत्तात्रय पाटील यांनी केले.ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या शिबीराचे उदघाटन होईल.यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार,उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे यांच्यासह तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत.
राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा. यासाठी प्रशासनामार्फत हा उपक्रम प्राथमिक शाळेच्या प्रांगणात होणार आहे. त्याचे नियोजनासाठी तहसीलदार शिल्पा ठोकडे ,गटविकास अधिकारी सुशील संसारे, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांच्या समवेत बैठक झाली.
छायाचित्र- सिद्धनेर्ली येथे महाराजस्व अभियान उपक्रमाचे नियोजनासाठी पाहणीवेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे,सरपंच दत्तात्रय पाटील व इतर
सिद्धनेर्ली, ता.४ः येथे शुक्रवारी(ता.६)रोजी शासन आपल्या दारीउपक्रमा अंतर्गत महा राजस्व अभियान राबवण्यात येणार आहे.सिद्धनेर्ली मंडळ अंतर्गत नऊ गावातील नागरिकांनी याचा फायदा घ्यावा .असे आवाहन सरपंच दत्तात्रय पाटील यांनी केले.
राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा. यासाठी प्रशासनामार्फत हा उपक्रम प्राथमिक शाळेच्या प्रांगणात होणार आहे. त्याचे नियोजनासाठी तहसीलदार शिल्पा ठोकडे ,गटविकास अधिकारी सुशील संसारे, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांच्या समवेत बैठक झाली.
छायाचित्र- सिद्धनेर्ली येथे महाराजस्व अभियान उपक्रमाचे नियोजनासाठी पाहणीवेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे,सरपंच दत्तात्रय पाटील व इतर
पोर्ले तर्फे ठाणे.ता 3 :- पोर्ले तर्फे ठाणे (ता पन्हाळा) येथील कासारी समूहाचे नेते व माजी जि.प.सदस्य प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्जेराव पाटील(तात्या )हनुमान विकास सेवा संस्थेची सन २०२१/२२ते सन२०२६/२७ साला करीता संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.पी.मटिरमणी (प्रथम श्रेणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पन्हाळा) यांनी काम पाहिले. बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे प्रकाश स.पाटील, पांडूरंग ल.पाटील, महादेव कृ. चौगुले, सरदार के.पाटील, भीमराव रं. साळोखे, आनंदा रा. शेवाळे, स्वरुप प.पाटील, हिंदुराव ई. खवरे, प्रकाश आ. पाटील, नारायण द. काशिद, नारायण य.चेचर, रामराव दा.चेचर, उमेश ज.जाधव, सुधीर बा.संकपाळ, खानु य. धनगर, पुष्पा शा.चौगुले, चिंगुबाई ब. उबाळे. यावेळी कासारी गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राशिवडे बुद्रुक, ता. २ :
येथील यशवंत विकास सेवा संस्थेच्या अध्यक्ष पदी सुभाष विनायक पाटील व उपाध्यक्ष पदी नामदेव यशवंत गोंगाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी स्वप्नील आगम होते.
बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ असे : डॉ. जालंदर पाटील, सागर मगदूम, रंगराव लाड, राजाराम चौगले, शशिकांत पाटील, यशवंत पाटील, महादेव गोनुगडे, सौ. दिपा पाटील, सौ. शकुंतला पाटील, सुर्याप्पा जोंग, दिनकर कांबळे. यावेळी जालंदर पाटील व सदाशिव ढोणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सी.डी.पाटील, जयवंत पाटील, जयवंत मगदूम, जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, सचिव भिकाजी यादव उपस्थित होते. स्वागत राजेंद्र पाटील यांनी केले. आभार रमेश पाटील यांनी मानले.
।।।।।।।।।।
फोटो
सकाळ वृत्तसेवा/ सांगवडेवाडी ता.2 महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधुन ग्रामपंचायत नेर्ली - विकासवाडी लोकनियुक्त सरपंच , गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या स्वखर्चातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आरोग्य व अपघात विमा करून सामाजिक बांधिलकी जपली. त्याचे पत्र ही देण्यातआले. यावेळी जनार्दन पाटील,कृष्णात पाटील,राहुल पाटील,अंकुश पुजारी,प्रदीप ढाले,रायगौंडा पुजारी, प्रदीप चौगुले,नितीन संकपाळ.यशवंत दिवटे उपस्थित होते.
फोटो ओळी..... नेर्ली येथील सरपंच प्रकाश पाटील यांनी कर्मचाऱ्यांना मोफत विमा पत्राचे वितरण केले.
राशिवडे बुद्रुक, ता. २ :
कोदवडे (ता.राधानगरी) येथील शिवशंभो विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी धनाजी भिवा पाटील व उपाध्यपदी शिवाजी गोपाळ भाट यांंची बिनविरोध निवड झाली. निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी सागर रानमाळे होते.
नुतन संचालक असे: आंनदा लक्ष्मण पाटील, गणपती कृष्णा पाटील( येळवडे) एकनाथ तुकाराम पाटील, प्रशांत संभाजी पाटील, शिवाजी बापु देवळकर, कृष्णात बाळू पाटील, किरण तानाजी पाटील, तानाजी गंगाराम कांबळे, राजश्री बाळासो पाटील, सुनिता कृष्णात पाटील.
।।।।।।।।।।।।।।।।।।।
फोटो: धनाजी पाटील ( पांढरा शर्ट)
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55030 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..