मनेची महाआरतीचा निर्णय मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनेची महाआरतीचा निर्णय मागे
मनेची महाआरतीचा निर्णय मागे

मनेची महाआरतीचा निर्णय मागे

sakal_logo
By

शहरात मनसेची महाआरती स्थगित
प्राथर्नास्थळावर बंदोबस्त; पोलिस अधिकारी - पदाधिकाऱ्यांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित महाआरती करण्याचा निर्णय मागे घेतला. दरम्यान खबरदारीचा भाग म्हणून प्रार्थना स्थळावर पोलिस बंदोबस्त ठेवला.
शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात आज मनसे पदाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यापूर्वी जुना राजवाडा पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी मनसे पदाधिकारी व मौलवी यांची बैठक घेतली होती. शहरातील काही प्रार्थनास्थळावरील पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून परवानगी घेऊन अजानपठण करताना नियमांचा भंग केला जाणार नाही, असे सांगण्यात आले. पोलिसांच्या विनंतीला मान देऊन महाआरती रद्द करत आहोत, असे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांनी पत्रकात म्हटले आहे.
बैठकीस पोलिस निरीक्षक नाळे, राजेश गवळी, ईश्वर ओमासे, संतोष जाधव यांच्यासह मनसेचे विजय करजगार, शहराध्यक्ष राजीव दिंडोर्ले, राजू जाधव, अभिजित राऊत, रत्नदीप चोपडे, अमित पाटील, राजन हुल्लोळी, सुनील तुपे, महावीर पिटके आदी उपस्थित होते. दरम्यान काही पदाधिकाऱ्यांना नोटीसाही बजावल्या होत्या.

मलकापुरात चालिसा पठण
मलकापूर ः येथे मनसे व हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने मलकापूर शहर प्रमुख अजय गुरव यांच्या नेतृत्वाखाली मारुती मंदिरासमोर हनुमान चालीसा पठण केले. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर, सतीश तांदळे, धनाजी आगलावे, बाळासाहेब कदम, प्रवीण कांबळे, डॉ. संजय गांधी, रमेश पडवळ, महेश विभूते,उत्तम शिंगटे,चेतन गुजर रूपेश वारंगे उपस्थित होते. शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता. या प्रकरणी चाळीस जणांवर गुन्हा दाखल केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55032 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top