इचलकरंजी पालिकेला 98 कोटी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी पालिकेला 98 कोटी मंजूर
इचलकरंजी पालिकेला 98 कोटी मंजूर

इचलकरंजी पालिकेला 98 कोटी मंजूर

sakal_logo
By

इचलकरंजी पालिकेला ९८ कोटी
थकीत सहाय्यक अनुदान; कर्मचाऱ्यांना सर्व प्रलंबित देणी मिळणार
इचलकरंजी, ता. ४ ः इचलकरंजी पालिकेला तब्बल ९८ कोटी ९ लाख रुपये राज्यात सर्वाधिक थकीत सहाय्यक अनुदान मंजूर झाले आहे. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून याबाबतचा आज अध्यादेश जारी करण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची प्रलंबित देणी आदा करता येणार आहेत. पालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२०१९ पासून शासनाकडून वेतनापोटी देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदानात कपात केली होती. साधारणपणे सरासरी ९ कोटी ५० लाख इतके दरमहा सहाय्यक अनुदान इचलकरंजी नगरपालिकेस प्राप्त होत होते; मात्र ६ ते ६.५० कोटी इतकेच सहाय्यक अनुदान मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन देणे अशक्य होत होते. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील देणी देतानाही अडचणी येत होत्या. थकबाकीसाठी अगदी वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्कीही आली होती. त्यामुळे एकूणच पालिकेचा आर्थिक कारभार ठप्प होत चालला होता. अन्य विकासकामांवर परिणाम होत होता.
या पार्श्वभूमीवर थकीत सहाय्यक अनुदान मिळावे, यासाठी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. तब्बल १३७ कोटी इतके थकीत सहाय्यक अनुदान मिळण्याबाबतचा प्रस्ताव इचलकरंजी पालिकेने सादर केला होता. खासदार धैर्यशील माने यांचा पाठपुरावाही महत्त्वाचा ठरला. राज्यात सर्वाधिक इचलकरंजी पालिकेसाठी तब्बल ९८ कोटी ९ लाखांचे थकीत सहाय्यक अनुदान मंजूर झाले आहे.

विनियोग असा होणार
थकीत सहाय्यक अनुदानापैकी पहिल्या टप्प्यातील हा निधी आहे. कार्यरत व निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी देता येणार आहेत. यापूर्वी पालिका फंडातील रक्कम वेतनासाठी वापरली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची देणी प्राधान्याने आदा केल्यानंतर उर्वरित रक्कम विकासकामांसाठी वापरता येणार असल्याचे सांगण्यात आले.

आनंदोत्सव साजरा
इचलकरंजी पालिकेला विक्रमी थकीत सहाय्यक अनुदान प्राप्त झाल्यानंतर कर्मचारी संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी साखर-पेढे यांचे वाटप करण्यात आले. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

मंजूर अनुदान दृष्टिक्षेप
इचलकरंजी - ९८ कोटी ९ लाख
जयसिंगपूर - २२ लाख ७५ हजार
कुरुंदवाड - १९ लाख ६५ हजार
मलकापूर - १२ लाख ८८ हजार
मुरगूड - ८ लाख ५४ हजार
पन्हाळा - ६ लाख ५१ हजार
शिरोळ - १ कोटी ३६ लाख
वडगाव - १८ लाख ९९ हजार
आजरा - १८ लाख ६४ हजार
चंदगड - ३१ लाख ६५ हजार.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55043 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top