गिजवणेच्या सेवा संस्थेत सत्तांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिजवणेच्या सेवा संस्थेत सत्तांतर
गिजवणेच्या सेवा संस्थेत सत्तांतर

गिजवणेच्या सेवा संस्थेत सत्तांतर

sakal_logo
By

गिजवणेच्या सेवा
संस्थेत सत्तांतर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील श्री विठ्ठल विकास सेवा संस्थेत सत्तांतर झाले. चुरशीने झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी केदारलिंग पॅनेलने सर्व १३ जागांवर दणदणीत विजय मिळविला. सर्व उमेदवार सुमारे दीडशे ते दोनशे मतांनी विजयी झाले. सत्ताधारी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनेलची पाटी कोरी राहिली.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी- सर्वसाधारण गट- बाबासाहेब पाटील (६२७), सिदगोंडा पाटील (५९२), विनायक पाटील (५५०), सुरेश देसुरे (५४७), राजाराम कडूकर (५३६), सुरेश कडूकर (५३९), सुरेश चव्हाण (५२७), शांतीनाथ पाटील (४९०). महिला राखीव- अश्विनी काळे (५९८), सुनंदा पोडजाळे (५६०). इतर मागास- सुभाष कुंभार (६१६), मागासवर्गीय राखीव- अमोल कांबळे (६१८), भटक्या जाती-जमाती- रमेश नाईक (६५७).
कै. राजगोंडा पाटील यांच्या प्रेरणेतून साकारलेल्या विजयी श्री केदारलिंग पॅनेलचे नेतृत्व गोडसाखरचे माजी संचालक बाबासाहेब पाटील, माजी सरपंच आण्णासाहेब पाटील, माजी अध्यक्ष रामगोंडा काळे यांनी केले. तर पराभूत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी उपसरपंच महावीर ऊर्फ माणिक पाटील यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55044 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top