शिव बसव जयंती कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिव बसव जयंती कार्यक्रम
शिव बसव जयंती कार्यक्रम

शिव बसव जयंती कार्यक्रम

sakal_logo
By

19408
कोल्हापूर : वीरशैव लिंगायत समाजातर्फे आयोजित शिव बसव जयंती कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री सतेज पाटील.

वीरशैव रुद्रभूमीसाठी दीड कोटीचा निधी

पालकमंत्री सतेज पाटील : शिवजयंती-बसवेश्वर जयंती कार्यक्रमात घोषणा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : ‘‘वीरशैव लिंगायत समाजाच्या जुन्या बुधवार पेठेतील रुद्रभूमीच्या साडेतीन एकर जागेभोवती दगडी भिंत बांधण्यासाठी, सुशोभिकरणासाठी दीड कोटीचा निधी दिला जाईल. त्यापैकी एक कोटी यावर्षी तर पन्नास लाखाचा निधी पुढील वर्षीच्या बजेटमध्ये दिला जाईल,’’ अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. दसरा चौकासमोरील चित्रदुर्ग मठामध्ये वीरशैव लिंगायत समाजातर्फे आयोजित शिव-बसव जयंती कार्यक्रम झाला. माजी आमदार श्रीमंत मालोजीराजे छत्रपती अध्यक्षस्थानी होते.
मंत्री पाटील म्हणाले, ‘‘वीरशैव समाजाने रुद्रभूमी विकासाचे घेतलेले कार्य हे उल्लेखनीय असून बाराव्या शतकात पुरोगामी विचार सर्वांसमोर मांडून त्याची अंमलबजवणी करणारे वीरशैव धर्माचे प्रसारक महात्मा बसवेश्वर हे जनतेचे कैवारी होते. वीरशैव समाजाच्या ज्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या मागण्यांचा जरुर विचार करु.’’
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी वीरशैव समाजाच्या कार्याचे कौतुक करुन व्यापार, उद्योग आणि विनयशील असलेल्या या समाजाच्या मागे मी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. मालोजीराजे यांनी वीरशैव समाज हा प्राचीन धर्म असून, बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी या धर्माचा प्रसार केला. त्यांच्या विचाराची आज खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. पाटील, श्री. क्षीरसागर, मालोजीराजे आणि जेष्ठ पत्रकार चन्नवीर भद्रेश्वरमठ (सोलापूर), श्रीकांत बनछोडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. संचालक नानासाहेब नष्टे, वसंतराव सांगवडेकर, चंद्रकांत हळदे, ॲड सतीश खोललांडे, किरण सांगावकर, गजानन सावर्डेकर, अशोक माळी, दिलीप गवळी, राजशेखर तंबाके, आदिल फरास, सुर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, वैभव सावडेकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता शेटे, माधवी बोधले, सुजाता विभूते, स्मिता हळदे, मंदा कुलगर्णी, सुनंदा नष्टे, शैला गाताडे, समाजबांधव उपस्थित होते. वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनिल गाताडे यांनी स्वागत केले. राजेश पाटील (चंदूरकर) यांनी प्रास्ताविक केले. सचिव राजू वाली यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55047 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top