
जिल्हा बार असोसिएशन
१९४६८ (फोटो ओव्हरसेट)
बदली झालेल्या
न्यायाधीशांना शुभेच्छा
जिल्हा बार असोसिएशनतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः जिल्हा व सत्र न्यायालयातील बदली झालेल्या न्यायाधीशांचा जिल्हा बार असोसिएशनतर्फे सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांनी सर्व न्यायाधीशांनी न्यायदानाचे काम खूप चांगले केले आहे. लवकरात लवकर कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन होऊन न्यायाधीशांना येथे काम करण्याची संधी मिळो, अशी सदिच्छा व्यक्त केली. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवाचे सदस्य ॲड. विवेक घाटगे, माजी अध्यक्ष ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. प्रकाश मोरे यांनी मनोगत व्यक्त करून बदली झालेल्या न्यायाधीशांच्या कामाचे कौतुक केले.
न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी जिल्हा न्यायालयात न्यायदानाचे काम करीत असताना चांगला अनुभव आल्याचे सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश पंकज देशपांडे यांनी कोल्हापूर येथे लवकरात लवकर खंडपीठ व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. संदीप चौगुले, ॲड. संकेत सावर्डेकर, ॲड. तृप्ती नलवडे यांच्यासह सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55054 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..