ललित गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ललित गांधी
ललित गांधी

ललित गांधी

sakal_logo
By

पुण्यात आज राष्ट्रीय व्यापार
महापरिषद ः ललित गांधी

व्यापार धोरण, भविष्यातील संधीवर चर्चा

कोल्हापूर, ता. ६ ः महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अॅग्रिकल्चर व जीतो यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे उद्या (ता. ७) आयोजित ‘जीतो कनेक्ट २०२२’ आंतरराष्ट्रीय परिषद व ट्रेड फेअरमध्ये बिझनेक्स्ट या राष्ट्रीय व्यापार महापरिषदेचे आयोजन केल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
परिषदेसाठी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत व राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणचे सीईओ अशोक दलवाई उपस्थित राहणार आहेत. जीतो, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर यांच्या वतीने व दि पूना मर्चंट्स चेंबर आणि पुणे व्यापारी महासंघातर्फे परिषदेचे आयोजन केल्याची माहिती गांधी व दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली. परिषदेसाठी नावनोंदणी आवश्यक असून, ‘जीतो कनेक्ट २०२२’ च्या संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करता येईल, असे महेंद्र पितळीया यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55056 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top