
कचरावेचकांची कार्यशाळा
कचरावेचक महिलांसाठी कार्यशाळा
कोल्हापूर : अवनि संस्थेमार्फत महिला सक्षमीकरण प्रकल्प अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यशाळेचे आयोजन केले. महिलांना बचतीची सवय, व्यवसाय प्रशिक्षण, शासकीय योजना, कर्ज संदर्भातील मार्गदर्शनाकरीता कार्यशाळेचे आयोजन केले. जिल्ह्यातील कचरावेचक वस्त्यांमध्ये कचरावेचक महिलांच्या बचत गटासाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळेचे आयोजन अवनि संस्था आणि बँक ऑफ इंडियातर्फे केले. गडमुडशिंगी, शिरोली, केर्ली, वडणगेतील तसेच विचारेमाळ, राजेंद्रनगर येथील कचरावेचक महिलांकरिता कार्यशाळा घेतली.
जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समुपदेशक उदय जोशी यांनी बचत गटातील कचरावेचक महिलांना मार्गदर्शन केले. महिलांना बँकेतील व्यवहारा संदर्भात माहिती दिली. नियमित बचतीचे फायदे, १२ रुपये आणि ३३० रुपये पंतप्रधान जीवन ज्योती व सुरक्षा विमाचे फायदे, कुटुंबातील लोकांना मिळणारे संरक्षण, अटल पेन्शन योजने संदर्भात माहिती, बचत गटाचे कर्ज आणि त्या संदर्भातील मार्गदर्शन केले. फायनान्सकडून घेण्यात येणाऱ्या कर्जाचे तोटे यावर मार्गदर्शन केले. प्रकल्प समन्वयक अभिजित जाधव, तेजस्विनी घोरपडे यांनी नियोजन केले. अध्यक्षा अनुराधा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55068 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..