
आजरा ः दारु पकडली
गोवा बनावटीची दारू
आजऱ्याजवळ पकडली
दोघांवर गुन्हा; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ४ ः येथील बुरुडे चौक येथे गोवा बनावटीची दारू आजरा पोलिसांनी जप्त केली आहे. मोटार व दारू असा ३ लाख १२ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आज पहाटे साडेचार वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिस हवालदार अनिल तराळ यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी- मोटार (एमएच २४ व्ही १६२४) मधून भरत संतू पाटील (वय ४२, हडलगे, ता. गडहिंग्लज) व किसन पांडुरंग येसणे (मडिलगे, ता. आजरा) हे गोवा बनावटीची दारू घेऊन महागावच्या दिशेने जात होते. पोलिसांना मोटारीचा संशय आल्याने पाठलाग करून त्यांनी मोटार पकडली. मोटारीची झडती घेतली असता दारूचे बाॅक्स सापडले. याची किंमत ६२ हजार ६४० रुपये आहे. पाटील व येसणे या दोघांच्या विरोधात आजरा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये पाटील याला ताब्यात घेतले आहे, तर येसणे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस हवालदार संतोष घस्ती अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55073 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..