
बहार भावनांचा कार्यक्रमाचे आयोजन
19423
‘बहर भावनांचा’ मराठी
गीतांचा कार्यक्रम रविवारी
कोल्हापूर : किरण कांबळे प्रस्तुत ‘बहर भावनांचा’ या कार्यक्रमात सादर होणार आहेत. ही मराठी गीतांची सदाबहार मैफिल रविवारी (ता.८) सायंकाळी सहा वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे होईल. कार्यक्रमासाठी पुण्याच्या गायिका विभावरी आपटे-जोशी तसेच गायिका शर्वरी जाधव मैफिली सादर करतील. शर्वरी मूळच्या कोल्हापूरच्या असून सध्या त्या मुंबईत स्थायिक आहेत. मुंबई येथील टीव्ही आणि चित्रपट अभिनेते विघ्नेश जोशी निवेदक म्हणून साथ लाभणार आहे. कार्यक्रमात सादर होणाऱ्या दर्जेदार गीतांसाठी संगीत साथीदार म्हणून सांगलीचे अविनाश इनामदार, आकाश साळोखे (सिंथेसायजर), सचिन जगताप (बासरी), पुण्याच्या गायत्री गोरे (सतार) तसेच पुण्याचे शैलेश देशपांडे (व्हायोलिन), अमित साळोखे (हार्मोनियम), प्रशांत देसाई (तबला), गुरु ढोले (परकशन), धीरज वाकरेकर (कोंगो/ढोलक), मनोज जोशी (ऑक्टोपॅड), सोहम जगताप (‘झी’ सारेगम फेम संतूरवादक) या वादकांची साथ लाभेल. अँडव्हान्स तिकिटे घरपोच मिळविण्यासाठी ६ मेपर्यंत मुकुंद वेल्हाळ, किरण कांबळे यांच्याशी संपर्क साधावा.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55077 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..