ॲस्‍टर आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲस्‍टर आधार
ॲस्‍टर आधार

ॲस्‍टर आधार

sakal_logo
By

आधार हॉस्पिटलममध्ये यकृत प्रत्यारोपण यशस्वी
डॉ. उल्हास दामले; जिल्ह्यातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा, भाजी विक्रेत्याला जीवदान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः जिल्ह्यातील पहिली यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आधार हॉस्पिटलमध्ये नुकतीच यशस्वी झाली. ३८ वर्षीय भाजी विक्रेत्याला यकृत बसविले. २४ वर्षीय तरुणाच्या अवयव दानामुळे चौघांना जीवदान मिळाले. त्यामुळे यापुढे अवयव दान वाढल्यास अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल, अशी माहिती ॲस्टर आधार हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. उल्हास दामले यांच्यासह अन्य डॉक्टरांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापुरात रस्ते अपघातात २४ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. आटोकाट प्रयत्न करूनही त्याच्या मेंदूचे कार्य थांबले. त्यानंतर त्याच्या कुटुंबाने अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डोळे, किडनी, हृदय व यकृत दान करण्याचे निश्चित झाले. याच वेळी एक भाजी विक्रेता दहा वर्षांपासून लिव्हर सिरॉयसिसने त्रस्त होता. त्याच्यावर ॲस्टर आधारमध्ये ‘त्या’ तरुणाने दान केलेले यकृत प्रत्यारोपण केले. अवघड शस्‍त्रक्रिया ॲस्टरमध्ये यशस्वी झाली.
गेली चार वर्षे किडनी आजाराने ३३ वर्षीय युवक त्रस्त होता, त्याला सतत डायलेसिस करावे लागत होते. त्याच्यावरही किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी केली. याच रुग्णाला हृदयविकाराचाही त्रास होता. हृदयाची लेप्ट व्हेंट्रीकल क्षमता २५ टक्के कमी झाली होती. अशा स्थितीतही किडनी प्रत्यारोपण यशस्वी केले. या रुग्णाला सात दिवसांनी घरी सोडले.
ॲस्टर आधारचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत शहा म्हणाले, ‘‘ॲस्टर हे कोल्हापुरातील अग्रगण्य हॉस्पिटल आहे. येथे पहिले डिसिज्ड लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी केल्याचा अभिमान आहे. या शस्त्रक्रियेत अचूकता महत्त्वाची असते. त्यासाठी अनुभवी तज्ज्ञांची उपलब्धता, अतिदक्षता विभागातील काळजी, अत्याधुनिक क्लिनिकल प्रोटोकॉल अशा सुविधा सक्षम आहेत. त्या सुविधा अधिक सक्षम करून भविष्यात अवयव प्रत्यारोपण सेवा अधिक व्यापक होईल. हा विभाग सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून विकसित करण्यात येईल. लिव्हीन डोनर व लहान मुलाचे लिव्हर ट्रान्सप्लांटच्या सेवा सुरू करण्यात येतील.’’


हजारांवर प्रत्यारोपण
डॉ. बिपीन विभुते म्हणाले, ‘‘आजवर १ हजारांवर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. मात्र, ‘ॲस्टर’मध्ये ही पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली. यापुढे ही अशा शस्त्रक्रिया कोल्हापुरात होऊ शकतील. त्यामुळे रुग्णांना मोठ्या शहरात जावे लागणार नाही. तसेच वाढता खर्च कमी होण्यास मदत होईल.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55079 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top