सतेज चषक फुटबॉल स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतेज चषक फुटबॉल स्पर्धा
सतेज चषक फुटबॉल स्पर्धा

सतेज चषक फुटबॉल स्पर्धा

sakal_logo
By

19405 किंवा 19406
कोल्हापूर : येथे सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खंडोबा तालीम विरुद्ध प्रॅक्टिस यांच्या सामन्यातील एक क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

लोगो - सतेज चषक फुटबॉल

जुना बुधवार, खंडोबाचे विजय
कोल्हापूर, ता. ४ : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज संयुक्त जुना बुधवार तालीम संघाने सम्राटनगर फुटबॉल क्लबवर २ - १ ने विजय मिळवला तर खंडोबा तालीम मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर ३ - १ ने विजय मिळवला. पांडबा जाधव व रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ स्पर्धा राजर्षी शाहू स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे.   
पहिल्या सामन्यात सम्राटनगरने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत गोल साधण्याचे प्रयत्न केले. यात धीरज क्षीरसागर याने २६ व्या मिनिटाला गोल नोंदवत पूर्वार्धात संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात बुधवार संघाने सातत्याने आक्रमण करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणला. त्यात रोहन कांबळे याने ६० तर रजत जाधव याने अधिकच्या वेळेत गोल नोंदवत सामना २-१ असा जिंकून दिला. सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी गैरवर्तन केल्याने वैयक्तिक बक्षीस देण्यात आले नाही.  
अन्य सामन्यात खंडोबा तालीम संघाने आक्रमक खेळ केला. सुरुवातीपासून सातत्याने आक्रमण करणाऱ्या खंडोबाच्या संकेत मेढे याने २५ व्या मिनिटाला गोल नोंदवत आघाडी घेतली. प्रत्युत्तर देणाऱ्या प्रॅक्टिसच्या इंद्रजित चौगुले याने ३५ व्या मिनिटाला गोल नोंदवत पूर्वार्धात सामना १ - १ असा बरोबरीत आणला. उत्तरार्धात खंडोबाचा आक्रमक खेळ सुरूच राहिला. सामन्याच्या ६७ व्या मिनिटाला दिग्विजय असनेकर तर अधिकच्या वेळेत कुणाल दळवी याने गोल नोंदवत खंडोबा तालीम संघाचा विजय निश्चित केला. लढवय्या खेळाडू म्हणून प्रॅक्टिसच्या इंद्रजित चौगले याला गौरवण्यात आले. 

खेळाडू भिडले
जुना बुधवार विरुद्ध सम्राटनगर यांच्यातील सामन्यादरम्यान दोन्ही संघामध्ये वाद झाले. सामना संपण्याच्या काही वेळ आधी दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांशी भिडले.

 आजचे सामने
सकाळी आठ - झुंजार क्लब विरुद्ध कोल्हापूर पोलिस 
दुपारी चार - बालगोपाल विरुद्ध फुलेवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55097 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top