
भाग दुसरा
लोगो कालच्या टुडे २ मेन मधून ः फक्त त्यात भाग २ असे टाका
----
चारचाकी वाहनांइतकीच
दुचाकीचीही खबरदारी हवी
सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : रोज चारचाकी वाहनांहून अधिक वापर दुचाकी वाहनांचा होत असतो. दुचाकी वाहन पार्किंग करताना चारचाकी वाहनांइतकी काळजी घेतली जात नाही. यामुळे वाढत्या उन्हाळ्यामुळे दुचाकी वाहनांमध्ये बिघाड होण्याची शक्यता बळावते. यातून वाचण्यासाठी काळजी घ्यावी लागते.
तापलेले इंजिन थंड होण्यासाठी दुचाकी शक्यतो सावलीत उभी करावी. उन्हाळ्यात पेट्रोलची काही प्रमाणात वाफ होते. त्यामुळे टाकी फूल करू नये. उन्हामध्ये जास्तवेळ गाडी उभी असल्यास पेट्रोल टाकीचे टोपण उघडून बंद करावे. यामुळे वाफेचा अतिरिक्त दबाव कमी होईल. इंजिनमध्ये ऑइल लेव्हल मेंटेन करावी. ऑइल कमी झाल्यास इंजिन गरम होऊन त्याचा थेट परिणाम वाहनाच्या कार्यक्षमतेवर होतो. अति गरम झाल्यास पिस्टन, रिंग, गिअर हे अधिक घर्षणाने खराब होतील. तसेच इंजिन सिज होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात धूळ जास्त असते. त्यामुळे दुचाकीचा एअर फिल्टर नियमितपणे स्वच्छ करावा. टायरमधील हवा ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार असावी. लॉंग ड्राइव्ह जायचे असल्यास हवा थोडी कमी ठेवा. लाँग ड्राइव्हला जाताना मधून-मधून वाहनाचा वेग कमी करावा, त्यामुळे तापलेले इंजिन थंड होण्यास मदत होते. वाळलेले गवत, पालापाचोळा आदी ठिकाणी मोटार उभी करू नका. सायलेंसरमधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे ते पेट घेऊ शकतात. वाहनांमधील बॅटरीच्या वायरिंगवर वाढत्या तापमानाचा परिणाम होत असतो. त्यामुळे वायरिंग सैल असू नये. त्याच्या कनेक्शन वरचेवर तपासणी करावी.
कोट
ऋतू कोणताही असो वाहनांची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या बदललेल्या निसर्ग चक्रामुळे गाडीची काळजी घेताना जनरल चेकअप व ऑइल बदली करण्यासारख्या प्राथमिक बाबी टाळणे घातक ठरू शकते. गाडी दुरुस्त असल्यास होणारे अपघात टळू शकतात.
-संजय घाटगे, सनराज हिरो सर्व्हिसेस
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55098 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..