
शिवाजी विद्यापीठ आंदोलन बातमी
19414
विधीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी
विद्यार्थ्यांचे कडकलक्ष्मी आंदोलन
कोल्हापूर, ता. ४ ः विधी विषयाची परीक्षा ऑनलाईन घ्यावी आणि जुलैपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर कडकलक्ष्मी आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावर भंडारा उधळत दंडवत घातला. मागण्यांचे निवेदन त्यांनी प्रभारी कुलसचिव व्ही.एन.शिंदे यांना दिले. शिवाजी विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विधी विभागाचे बहुतांशी विद्यार्थी बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षेचा अभ्यास करतात. त्यामुळे विधी विभागाची परीक्षा मे मध्ये घ्यावी. तसेच ही परीक्षा ऑनलाईन असावी. आंदोलनकर्त्यांना प्रवेशद्वारावर अडवल्याने त्यांनी तेथे निषेधसभा घेतली. त्यात इचलकरंजीतील नवीन युवक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संतोष कांदेकर, ‘एआयवायएफ’ राष्ट्रीय कौन्सिल सदस्य गिरीश फोंडे, राष्ट्रवादी पदवीधर कोल्हापूर संघाचे अनिल घाटगे, सौरभ शेटे आदींनी मार्गदर्शन केले. आंदोलनात अभिजीत खोत, शीतल दिंडे, मनीषा घाटगे, योगिता देसाई, रूपेश माने, प्रवीण होनराव, सुभाष बिरंजे, वृषभ रजपूत, अमित कदम आदी सहभागी झाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55112 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..