
आवश्यक- संक्षिप्त
19451
अंबाबाई भक्त मंडळातर्फे शाहू थाळी
कोल्हापूर ः राजर्षी शाहू स्मृतीशताब्दीनिमित्त येथील श्री अंबाबाई भक्त मंडळातर्फे शाहू थाळी उपक्रमाला प्रारंभ झाला. कपीलतीर्थ मार्केट येथील भाजी विक्री करणाऱ्या ज्येष्ठ महिलांना मोफत भोजनाची पार्सल देण्यात आली. आमदार जयश्री जाधव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी हा उपक्रम सद्यस्थितीत गरजेचा असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्ष संजय साळोखे, उपाध्यक्षा महेश्वरी सरनोबत, सचिव सुरेश पाटील, खजानीस संगीता साळोखे, रमेश चव्हाण, सुरेश मिरजकर, पद्मा बोंद्रे, मंगल कट्टी, राजेश पाटील, प्रमोद सावंत, अतुल निंगुरे, सुमन वाडेकर आदी उपस्थित होते.
.............
१९४५२
ॲड. अश्विनी बाटे यांना पीएच.डी
कोल्हापूर ः येथील ग्राहक न्यायालयात विधी तज्ञ म्हणून ॲड. अश्विनी बाटे यांना समाजकार्य विषयातील ‘ए स्टडी ऑन सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन्स ऑफऑटो रिक्षा ड्रायव्हर्स इन कोल्हापूर सिटी‘ या प्रबंधाला शिवाजी विद्यापीठाने नुकतीच ‘पीएच. डी‘ दिली. ॲड. बाटे विविध सामाजिक संस्थांशी निगडीत असून विशेषतः महिलांविषयी कायद्याच्या जनजागृतीपर कार्यक्रमाशी त्या जोडल्या गेल्या आहेत. त्यांना गारगोटी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. डी. जी. नेजकर, सायबर कॉलेजचे सचिव डॉ. रणजीत शिंदे, समाजकार्य विभागाचे प्रमुख डॉ. दीपक भोसले, प्रा. डॉ. अंबादास मोहिते, कर्वे इन्स्टिट्यूटचे माजी संचालक डॉ. दीपक वालोकर, डॉ. मेघा गुळवणी, प्रा. शोभा काळेबाग, नंदकुमार देसाई, डॉ. स्टीव्हन अल्वारिस, ॲड. राजेंद्र वायंगणकर आदींचे मार्गदर्शन लाभले.
..........
19457
जिल्हा कब्बडी संघात आदित्य पोवार
कोल्हापूर ः राज्य अठेचाळीसाव्या कुमार गट कब्बडी स्पर्धेसाठी इचलकरंजी येथील जयहिंद मंडळाचा खेळाडू आदित्य पोवारची जिल्हा कब्बडी संघात निवड झाली. आदित्यने जयहिंद मंडळाकडून सराव करताना रावज ॲकॅडमीकडून प्रशिक्षण घेतले आहे. त्याला डॉ. रमेश भेंडिगिरी, सुनिल सुतके, कृष्णा भिसे, देवेंद्र बिरनाळे, राजर्षी शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार, मंडळाचे अध्यक्ष सत्यनारायण डाळ्या, कार्याध्यक्ष उदय चव्हाण, कार्यवाह दिलीप ढोकळे आदींचे मार्गदर्शन लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55115 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..