महापालिका स्मृती शताब्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका स्मृती शताब्दी
महापालिका स्मृती शताब्दी

महापालिका स्मृती शताब्दी

sakal_logo
By

पालिकेतही पाळणार
१०० सेकंद स्तब्धता
केएमटी बसेसही थांबणार; १०० नंबरची प्रतिकृती साकारणार
कोल्हापूर, ता. ४ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त महापालिकेच्यावतीने शुक्रवारी (ता. ६) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सर्व कार्यालयात स्तब्धता पाळली जाणार असून केएमटीच्या बस प्रवाशांसह जिथे असतील तिथे थांबवून कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.
सकाळी साडेआठ वाजता नर्सरी बाग येथील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्थळ व दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला जाईल. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजता हजर राहतील. सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध राहून कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. महापालिका चौकात अग्निशमनचे जवान सकाळी १० वाजता एकत्र जमून १०० नंबरची प्रतिकृती तयार करणार आहेत. महापालिकेच्या शाळा व कॉलेजमध्ये विद्यार्थी, शिक्षक व पालक शाळेच्या मैदानावर स्तब्ध उभे राहणार आहेत.
शहरामध्ये ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या ऑडिओ सिस्टिमवर जनजागृतीची क्लिप प्रसारीत केली जाणार आहे. विभागीय कार्यालयाअंतर्गत सोसायटी, कॉलनी व गृहनिर्माण संस्था यांच्या सहभागासाठी नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. ते सकाळी दहा वाजता सामूहिक कार्यक्रमात सहभागाबाबत जनजागृती करणार आहेत. आरोग्य विभागामार्फत ऑटो टिपरवर ऑडिओ क्लिप प्रसारित केली जात आहे. या उपक्रमात कोल्हापूर वासीयांनी उत्फुर्तपणे प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55123 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top