
भाजप आंदोलन कचरा
19470
कचरा घोटाळ्यातील
आरोपींवर होणार कारवाई
आज आदेश ; भाजपच्या ठिय्या आंदोलनाला यश
कोल्हापूर, ता. ४ ः जानेवारीत उघडकीस आणलेल्या कचरा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई केली नसल्याने भाजपने आज सकाळी अकरापासून प्रशासकांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाने कारवाईचा अंतिम अहवाल प्रशासकांना सायंकाळी उशिरा दिला. त्यावर उद्या(ता.५) कारवाईचे आदेश देण्यात येतील असे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मान्य केले.
महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरील कचरा प्रक्रियेविना कसबा बावडा येथील शेतात पसरल्याची बाब भाजपने जानेवारीत उघडकीस आणली. शेतात कचरा पसरणे हे पर्यावरणाच्या आणि कायद्याच्याही दृष्टीने विघातक असल्याचे भाजपने प्रशासनास दाखवून दिले. भाजपच्या पाठपुराव्याने अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती.
या समितीने अहवाल सादर करून तीन महिने लोटले तरीही दोषींवर कारवाई केली जात नव्हती. भाजपने प्रशासकांच्या कार्यालयात ठिय्या मारण्याचा इशारा दिला. त्यानुसार माजी नगरसेवक अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे व विजयसिंह खाडे-पाटील सकाळी प्रशासक कार्यालयात पोहोचले. प्रशासकांना भेटून जोवर कारवाईचा आदेश निघत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही असे सांगितले. दोन वेळा प्रशासकांशी तर एकदा अतिरिक्त आयुक्त व उपायुक्तांशी चर्चा झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी कारवाईचा अंतिम प्रस्ताव प्रशासकांकडे सोपविला. आदेश निघेपर्यंत कार्यालय न सोडण्यावर कार्यकर्ते ठाम होते. तेंव्हा प्रशासकांनी उद्या कारवाई आदेश काढतो, आंदोलन थांबवा अशा आवाहनानंतर आंदोलन थांबविले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55126 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..