
राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता
१९५०४
लोगो ः पालिका
राजकीय घडामोडींना
वेग येण्याची शक्यता
इचलकरंजी, ता. ४ ः सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्ह्यातील नऊ पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वीच या पालिकांची प्रारूप प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा एकदा हरकती आणि सूचना दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी पुढे जाण्याची शक्यता गृहीत धरुन राजकीय हालचाली थंडावल्या होत्या; पण आता पुन्हा एकदा नजीकच्या काळात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
इचलकंरजी, गडहिंग्लज, जयसिंगपूर, पेठवडगाव, कुरुंदवाड, मलकापूर, पन्हाळा, कागल, मुरगूड नगरपालिकांच्या विद्यमान सभागृहांची मुदत गत डिसेंबरअखेर संपली. त्यामुळे या पालिकांवर प्रशासकांची नियुक्ती केली.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरच राज्यातील पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार असल्याचे राजकीय पक्षांकडून ठामपणे सांगण्यात आले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षामधील इच्छुक, कार्यकर्ते निवांत होते. निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या कार्यक्रमालाही स्थगिती दिली होती. त्यामुळे संभाव्य राजकीय हालचालीही थंडावल्या. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर पुन्हा एकदा राजकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. इचलकरंजी पालिकेत ओबीसींसाठी १७ जागा आरक्षित होत्या. त्यामध्ये नऊ महिलांसाठीच्या जागांचा समावेश होता; पण आता त्या आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. आता निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार, याची आता उत्सुकता लागली आहे. याबाबत तर्क-वितर्क करण्यात येत आहेत. त्यामुळे या संदर्भातील पुढील घडामोडींकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष आहे.
इचलकरंजी पालिका
एकूण जागा - ६४
मागास प्रवर्गासाठी राखीव - ६ (महिलांसाठी तीन राखीव)
महिला प्रवर्गासाठी राखीव - २९
सर्वसाधारण खुल्या जागा - २९
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55133 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..