देवस्थानच्या जमिनी लुटून पालकमंत्र्यांचे साम्राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवस्थानच्या जमिनी लुटून पालकमंत्र्यांचे साम्राज्य
देवस्थानच्या जमिनी लुटून पालकमंत्र्यांचे साम्राज्य

देवस्थानच्या जमिनी लुटून पालकमंत्र्यांचे साम्राज्य

sakal_logo
By

‘देवस्थान’च्या जमिनी लुटून केले साम्राज्य
शौमिका महाडिक; पुरावे घेऊन चर्चेस येण्याचे पालकमंत्र्यांना दिले खुले आव्हान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : देवस्थानच्या जमिनी लुटून पालकमंत्र्यांनी साम्राज्य उभ केले आहे. त्यांनी हडप केलेल्या जमिनीचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यांनी हडप केलेल्या जमिनींचा हिशेब देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे. महाडिकांनी जमीन लाटली असेल तर ते पुराव्यानिशी सादर करावे, असे खुले आव्हान गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी दिले. आम्ही चांगल्याला चांगले म्हणतो कारण आम्ही महाडिक आहे, पाटील नाही, असा टोलही त्यांनी पालकमंत्र्यांना लगावला.
उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या काल कदमवाडीत झालेल्या विजयी मेळाव्यात पालकमंत्री सतेज पाटील यांनी जमिनी हडप करायला मी महाडिक नाही, पाटील आहे असा आरोप केला होता. त्याला आज शौमिका यांनी पत्रकार परिषदेत प्रत्ययुत्तर दिले.
महाडिक म्हणाल्या, ‘‘जमीन लाटण्यात त्यांना खूप रस आहे. त्यामुळे गोकुळ निवडणूक झाल्यानंतर लगेचच जमिनीचे व्यवहार करावे असे वाटले असेल. याबद्दल जनजागृती केल्यानंतर हा निर्णय मागे घ्यावा लागला. गोकुळ निवडणूकीपूर्वी पालकमंत्र्यांनी गोकुळमध्ये महाडिकांचे टॅंकर जास्त आहे, असे आरोप केले होते. ते सर्व आरोपांसंदर्भात गोकुळकडे याची माहिती मागवली. यामध्ये गोकुळ प्रशासनाने महाडिक यांनी कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार केलेला नाही. इतर टॅंकरना जेवढे भाडे दिले जाते, तेवढेच भाडे महाडिक यांच्या व्यंक्‍टेश्‍वराच्या टॅंकरला दिले जातात, असे उत्तर देऊन गोकुळ प्रशासनानेच पालकमंत्र्यांचे आरोप खोडून काढले.


उक्ती आणि कृतीत फरक
काही महिन्यांपूर्वी महिला सन्मानाच्या गप्पा मारणारे नेते आज एका महिला संचालकाच्या अधिकारावर गदा आणत आहेत. ते नेते अधिकाऱ्यांना मागवलेली माहिती द्या म्हणून सांगत नसतील तर हे दुदैवी आहे. कृती एक आणि बोलणे एक असेच पालकमंत्र्यांचे वागणे आहे.

पालकमंत्री कोणत्या अधिकाऱ्याने आले
सत्तांतर झाल्यानंतर गोकुळच्या पहिल्या सभेला पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्याच नात्याने माजी आमदार महादेवराव महाडिकही गोकुळच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहत होते. जर पालकमंत्र्यांची उपस्थिती योग्य असेल तर महाडिक यांचीही उपस्थिती योग्यच आहे, असेही महाडिक यांनी सांगितले.


विश्‍वासघातकी...
गोकुळच्या कारभारात महाडिक यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही. गोकुळमध्ये संचालक आणि कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे महाडिक असताना होती तशी लोकशाही आता आहे का? हे महाडिक यांचा विश्‍वासघात करणाऱ्या लोकांनी याचा विचार करावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55134 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top