आजरा कारखान्याकडून ऊस तोडणी, वाहतुक करार सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा कारखान्याकडून ऊस तोडणी, वाहतुक करार सुरू
आजरा कारखान्याकडून ऊस तोडणी, वाहतुक करार सुरू

आजरा कारखान्याकडून ऊस तोडणी, वाहतुक करार सुरू

sakal_logo
By

19469
गवसे (ता. आजरा) ः येथील कारखान्यावर कराराची प्रत ठेकेदाराला देताना आमदार प्रकाश आबिटकर. या वेळी अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे व अन्य.

आजरा कारखान्याकडून
तोडणी, वाहतूक करार सुरू
आजरा, ता. ४ ः आजरा कारखान्याकडून गळीत हंगामासाठी लागणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेची करार प्रक्रियेला अक्षय्‍य तृतीयाच्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पहिल्या पाच उसतोडणी वाहतुकीचे करार करून प्रारंभ झाला. कारखान्याच्या पुढील गळीत हंगामाची कारखाना व्यवस्थापनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. साडेचार लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. दररोज साडेतीन हजार टन गाळपासाठी १४० दिवस गाळपाचे नियोजन कारखान्याचे शेती विभागाने निश्चित केले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ५ हजार हेक्टर व कार्यक्षेत्राबाहेर पाच हजार हेक्टर अशा दहा हजार हेक्टरवर ऊस क्षेत्राच्या नोंदी केल्या जाणार आहेत. आजअखेर एकूण ७ हजार ८५२ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद पूर्ण केली आहे. त्याचबरोबर तोडणी वाहतुकीसाठी ट्रक, ट्रॅक्टर व छकडी अशा २६० बिड व स्थानिक १५० यंत्रणेचे करार करणार आहे. उचंगी, सर्फनाला प्रकल्प पूर्णत्वासाठी प्रयत्न असल्याचे या वेळी बोलतांना आबिटकर यांनी सांगितले. इच्छुक ऊस तोडणी वाहतूक व ठेकेदारांनी कागद पत्रांची पूर्तता करून वेळेत करार करावेत, असे आवाहन अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी या वेळी केले. या वेळी एम. के. देसाई, दिगंबर देसाई, दशरथ अमृते. कार्यकारी संचालक डॉ. तानाजी भोसले, सेक्रेटरी व्ही. के. ज्योती, जनरल मॅनेजर (टेक्नि) व्ही. एच. गुजर, चिफ केमिस्ट गणेश पाटील, एश. एन. व्हरकट, कारखाना कर्मचारी, वाहतुकदार उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55137 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top