
लाच लुचपत कारवाई
१९४९९
लाचप्रकरणात सहभाग;
सफाई कामगाराला अटक
उपअधीक्षक बुधवंत; वैद्यकीय रजा प्रकरण
कोल्हापूर, ता. ४ ः लाच प्रकरणात सहभाग अढळल्याने झाडू कामगारास अटक केली. भिकाजी राजाराम कांबळे (वय ४७, टिंबर मार्केट परिसर) असे संशयिताचे नाव असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी सांगितले.
तक्रारदार कोल्हापूर महापालिकेत सफाई कामगार आहेत. आजारी असल्याने त्यांनी ४ जानेवारीला वैद्यकीय रजेचा अर्ज दिला होता. तब्येत बरी झाल्यानंतर ते कामावर हजर झाले; पण त्या वेळी त्यांनी दिलेला अर्ज नामंजूर झाला. त्यांनी सहायक आरोग्य निरीक्षक, प्रभारी सॅनेटरी इन्स्पेक्टरांची भेट घेतली. त्यांनी फिटनेस सर्टिफिकेट आणण्यास सांगितले. तक्रारदारांनी फिटनेस सर्टिफिकेट हजर केले. सहायक आरोग्य निरीक्षकांनी वैद्यकीय रजा मंजूर केली आहे. त्यासाठी एक हजार रूपये लाचेची मागणी केली. या संबंधीची तक्रार तक्रारदारांनी ३१ जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार सापळा लावून संबंधित निरीक्षकावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. तपासात संशयित कांबळे याने तक्रारदारास लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार त्याला अटक केल्याचे बुधवंत यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55139 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..