
महाविकास आघाडीतर्फे उद्या आदरांजली
राजर्षी शाहू अभिवादन
सभेस उद्या
मुख्यमंत्री येणार
कोल्हापूर, ता. ४ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दीनिमित्त शुक्रवारी (ता. ६) महाविकास आघाडीतर्फे अभिवादन सभा होणार आहे. सकाळी दहापासून शंभर सेकंद स्तब्धता पाळून तमाम कोल्हापूरकर राजर्षींना अभिवादन करतील. त्यानंतर साडेदहाला श्री शाहू छत्रपती मिलमध्ये अभिवादन सभा होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच जिल्ह्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींची सभेला उपस्थिती असेल. या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण आदींनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55148 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..