वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अँप लॉन्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अँप लॉन्च
वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अँप लॉन्च

वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अँप लॉन्च

sakal_logo
By

19498
चंद्रपूर ः येथे राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अधिवेशनात ॲपच्या अनावरणप्रसंगी सुधीर मुनगंटीवार आदी.

राज्य वृत्तपत्र विक्रेता
संघटनेच्या ॲपचे अनावरण
कोल्हापूर, ता. ५ : राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या VVSMaharashtra या ॲपचे अनावरण माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूर येथे झालेल्या अधिवेशनात करण्यात आले. कोरोना काळात जीव धोक्यात घालून वाचकांना जागृत ठेवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी केले. ओडिशा सरकारने कोरोना संकटातून सावरण्यासाठी राज्यातील वृत्तपत्र विक्रेता बांधवांना मदत जाहीर केली. मात्र, देशातील प्रगत राज्य महाराष्ट्रातील विक्रेत्यांना अजूनपर्यंत कोणतीही मदत जाहीर करण्यात आली नाही. किमान नोंदही घेतली नाही. राज्य आणि केंद्र सरकार त्यांच्या योजना वृत्तपत्रांतून जाहीर करतात. वृत्तपत्र विक्रेता ऊन, वारा, पाऊस, कोरोनाची तमा न बाळगता घरोघरी वितरण करतात. मात्र, अजूनही असंघटित असणारा हा वर्ग दुर्लक्षित राहिला आहे. राज्यातील या असंघटित वृत्तपत्र विक्रेता बांधवांना संघटित करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊन संघटित केले जाईल. यात या ॲपद्वारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील संघटनांची संलग्नता करून वृत्तपत्र विक्रेत्यांची अधिकृत नोंदणी करण्यात येणार आहे.
यात वृत्तपत्र विक्रेत्यांना सदस्य नोंदणी केल्यावर अधिकृत ओळखपत्रही संघटनेकडून दिले जाईल. या ॲपच्या माध्यमातून राज्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांची अधिकृत माहिती गोळा केली जाणार आहे. शासनदरबारी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती राज्य वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र पवार, कार्यकारी अध्यक्ष सुनील पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, कोशाध्यक्ष गोरख भिलारे यांनी दिली.

चौकट
असे करा ॲप डाउनलोड
गुगल प्ले स्टोअरवर जाऊन किंवा सोबत दिलेला QR कोड स्कॅन करून VVSMaharashtra हे ॲप डाउनलोड करावे. त्यात मोबाईल क्रमांक टाकल्यावर ओटीपी पाठविला जाईल. तो टाकल्यास ॲपमध्ये प्रवेश करता येणार आहे. जिल्ह्यातील संघटनांनी आपल्या संघटनेची संलग्नता करून घ्यावी. सर्व विक्रेत्यांची सदस्य नोंदणी करून घेता येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55149 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top