शाहू आदरांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू आदरांजली
शाहू आदरांजली

शाहू आदरांजली

sakal_logo
By

कृतज्ञता हा लोगो घेणे...............

शंभर सेकंद
आपल्या लोकराजासाठी
उद्या वाहूया आदरांजली; ‘सकाळ’चे कोल्हापूरकरांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने शुक्रवारी (ता.६) सकाळी दहा वाजता शंभर सेकंद स्तब्ध राहून राजर्षींना आदरांजली वाहिली जाणार आहे. आपण ज्या ठिकाणी असू, त्या ठिकाणी या उपक्रमांत तमाम कोल्हापूरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘सकाळ’ परिवाराने केले आहे.
राजर्षी शाहूंनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राज्यकारभार केला. शिक्षणापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत आणि कुस्तीपासून ते संगीत नाटकापर्यंत माणसाच्या सर्वांगीण गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्याची अंमलबजावणीही केली. साहजिकच सर्वच क्षेत्रांत कोल्हापूर आघाडीवर राहिले. कोल्हापूरकर म्हणून आपलं जगणं अभिमानास्पद करणाऱ्या या लोकराजाप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आदरांजली उपक्रमाच्या निमित्ताने सर्वांना मिळणार आहे. ‘सकाळ’ परिवाराने राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने ‘पुन्हा साथ देऊया, चला, पंचगंगा वाचवूया’ अशी साद कोल्हापूरकरांना घातली आणि हजारो कोल्हापूरकर पंचगंगेसाठी पुन्हा एकवटले. अशाच पध्दतीने आता आपल्या लोकराजासाठी आपण जिथे असू तिथे शंभर सेकंद स्तब्ध राहून आदरांजली वाहूया...!

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55153 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top