गोकुळमध्ये टेंडर प्रक्रिया, दूध दरवाढीत हुकूमशाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळमध्ये टेंडर प्रक्रिया, दूध दरवाढीत हुकूमशाही
गोकुळमध्ये टेंडर प्रक्रिया, दूध दरवाढीत हुकूमशाही

गोकुळमध्ये टेंडर प्रक्रिया, दूध दरवाढीत हुकूमशाही

sakal_logo
By

टेंडर प्रक्रियेसह दूध दरवाढीत हुकूमशाही
शौमिका महाडिक; मंत्री हसन मुश्रीफ यांचा ‘गोकुळ’मध्ये हस्तक्षेप नाही
कोल्हापूर, ता. ४ : दूध दरवाढ ग्राहकांच्या माथी मारली, संचालकांना स्वतंत्र निर्णय घेण्यास मोकळीक नाही, टेंडर प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने होत नाहीत, तसेच, दुधाच्या गुणवत्तेबद्दलही तक्रारी येत असल्याची टीका गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी आज केली. दूध उत्पादकांसोबत सत्ताधाऱ्यांकडून झालेल्या विश्वासघाताची वर्षपूर्ती असल्याचेही महाडिक यांनी नमूद केले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा गोकुळमध्ये हस्तक्षेप होत असल्याचे ऐकीवात नाही; पण पालकमंत्र्यांची हुकूमशाही ‘गोकुळ’साठी मारक ठरेल, आसा आरोपही त्यांनी केला.
सौ. महाडिक म्हणाल्या, ‘‘टेंडरचे नियम ठरवताना विशिष्ट संघाला फायदा होण्याचे नियोजन केले आहे. ठराविक दराशिवाय कमी दराचे टेंडर स्वीकारले जाणार नाही. कमी दर म्हणजे किती रक्कम याबद्दल गुप्तता ठेवली आहे. कोणाचे टेंडर स्वीकारायचे आणि मंजूर करायचे याचे सर्वाधिकार अध्यक्षांना देणे ही हुकूमशाही आहे. सत्ता परिवर्तनानंतर दूध विक्रीमध्ये ६ रुपयांची वाढ केली आहे. जिल्ह्यात दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ ते ३ रुपयांची वाढ केली आहे. २०१७ मध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळची दूध दरवाढ ग्राहकांच्या माथी का, असा सवाल केला होता. खरेदी दरात वाढ केली पण ती वाढ ग्राहकांच्या माध्यमातून का वसूल करता असा सवाल केला होता. एक वर्षात यांनी कोणती काटकसर केली. त्यांनी कंत्राटी कामगार कमी केले आणि पुन्हा घेतले. उत्तरच्या निवडणुकीनंतर दूधदरवाढ का लादली, याचे उत्तर द्यावे. तीन महिन्यात दुग्धजन्य उत्पादन विक्रीत घट झाली आहे. दुधाच्या गुणवत्तेतही फरक झाला आहे. याबद्दल तक्रारी येत आहे. राजकीय हेतून महिला दूध संस्था बंद करणे, त्यांची दूध संकलन बंद करणे, विरोधकांना जाणीव पूर्वक त्रास दिले जात आहे.’’


खोडा घालायला पाटील नाही
ईद व अक्षय्यतृतीयानिमित्त गोकुळने २० लाख लिटर दुधाची विक्री केली. त्याबद्दल प्रशासनाचे कौतुक आहे. जे चांगले आहे त्याचे कौतुक करतो. चांगल्या कामात खोडा घालायला आम्ही पाटील नाही, महाडिक आहोत अशीही टीका महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55158 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top