
गोकुळ दूध विक्रीत 5 कोटी 60 लाखांची वाढ
गोकुळचा कारभार पारदर्शी
अध्यक्ष विश्वास पाटील; दूध विक्रीत ५ कोटी ६० लाख लिटरची वाढ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : गोकुळ दधाला आणि दुग्धजन्य पदार्थांना दररोज मागणी वाढत आहे. दर्जा आणि गुणवत्तेमुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर देशात मागणी वाढली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ५ कोटी ६० लाख लिटरने दूध विक्री वाढली आहे. तर, गोकुळच्या तुलनेते इतर कंपन्यांच्या दूग्धजन्य पदार्थांचे दर कमी होते. याचा विक्रीवर परिणाम झाला आहे. टेंडर प्रक्रिया पारदर्शी होत आहे. संघाच्या निर्णय प्रक्रियेत कोणाचाही हस्तक्षेप नसल्याचे माहिती अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आज निवेदनाद्वारे दिली. संचालिका शौमिका महाडिक यांनी केलेल्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, ग्राहकांकडून ४ ते ६ रुपये वसूल करून दूध उत्पादकांला २ ते ३ रुपयाची वाढ दिली. इतर सर्व ठिकाणी दरवाढ आधी केली गेली? आणि नंतर कोल्हापूरची दरवाढ झाली. २०२१-२०२२ करिता ४७.२८ कोटी लिटर्स इतकी आहे. ती गतसालाच्या तुलनेत ५.६० कोटी लिटर्स इतकी वाढली आहे. एका दिवसात २० लाख लिटर्स पेक्षा जास्त दूध विक्री करून सिद्ध केले आहे.
दूध विक्री व दुग्धजन्य पदार्थामधून मिळणारी रक्कम दूध उत्पादकांना दिली जाते. दूध खरेदी किमतीमधील दरवाढ विचारात घेवून दुग्धजन्य पदार्थांचे दर वाढविणे क्रमप्राप्त होते, याचवेळी बाजारातील इतर स्पर्धकांच्या दुग्धजन्य पदार्थांच्या किंमती कमी होत्या. त्याच्या परिणाम विक्रीवर झाला आहे. कोणत्याही कामासाठी टेंडर्स काढतात. संचालक मिटींगमध्ये त्यावर संचालकांच्या सह्या घेतल्या आहेत. दराचा तुलनात्मक तक्ता करून संचालक मंडळाच्या दराबाबत टेंडर्सधारकांशी चर्चा होऊन दर निश्चित केले आहेत. कमीत कमी दर देणाऱ्या संस्थेस टँकर दूध वाहतुकीचे टेडर्स मंजूर केले आहे. निर्णय प्रक्रियेत सर्वांचे मत विचारात घेऊन निर्णय होत असल्याने संचालकांना निर्णय घेण्याची मोकळीक नाही हे म्हणणे चुकीचे आहे. कामकाजाचा आलेख चढत्या दिशेने आहे, याबद्दल दूध उत्पाकांच्या मनामध्ये कोणत्या हि प्रकारची शंका नाही. त्यामुळे दूध संघाच्या १ वर्षाच्या कामकाजा बाबत दिशाभुल करणे टाळावे. आपणास दूध संघाबद्दल कळवळा आहे म्हणता मग संघाची नाहक बदनामी का करता.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55163 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..