चालिसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चालिसा
चालिसा

चालिसा

sakal_logo
By

१९३५५
जिल्ह्यात ठिकठिकाणी हनुमान चालिसा पठण
कडेकोट पोलिस बंदोबस्त; मनसेच्या पदाधिकाऱ्यांना बजावल्या नोटिसा
कोल्हापूर, ता. ४ ः जिल्ह्यात आज ठिकठिकाणी हनुमान चालिसा पठण करण्यात आले. दरम्यान गडहिंग्लजमधील मुस्लिम समाजाने यापुढे अजान भोंग्यावरून दिली जाणार नाही, तसे पत्र प्रांताधिकारी व पोलिस निरीक्षकांना दिले.
इचलकरंजीत चालिसा पठण
इचलकरंजी : कडक पोलीस बंदोबस्तात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकत्यांकडून सोन्या मारुती मंदिरासमोर हनुमान चालीसा पठण केले. दरम्यान शहरात काही ठिकाणी कमी आवाजात तर काही ठिकाणी पहाटे भोंग्याविना नमाज पठन झाले. दुपारी बाराच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकत्र आले. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्याकडे चालीसा पठणासाठी परवानगीची मागणी केली. अखेर तासाभराच्या प्रतीक्षेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी हनुमान चालीसा पठणासाठी सशर्त परवानगी दिली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हनुमान चालीसा पठण करण्यात आले. रवि गोंदकर,मोहन मालवणकर, प्रताप पाटील, संदिप पोवार,शहाजी भोसले, बाळासाहेब राजमाने, महेश शेंडे,रोहित कोटकर, रामचंद्र गलकोटे, सिंधु शिंदे, छाया कोरवी यांसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, गावभाग, शिवाजीनगर आणि शहापूर पोलिसांनी २० हुन अधिक मनसे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत.

गडहिंग्लजला अजान भोंग्यावरून बंद
गडहिंग्लज : मशिदीवरील भोंग्यावरुन सर्वत्र राजकारण पेटलेले असताना येथील मुस्लिम समाजाने आदर्शवत निर्णय घेतला आहे. शहरातील तिन्ही मशिदीवरुन होणारी अजान यापुढे भोंग्यावरुन दिली जाणार नाही. त्याबाबतचे पत्र येथील प्रांताधिकाऱ्यांना व पोलिस निरिक्षकांना दिले. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी निवेदन स्वीकारले. सुन्नी जुम्मा मस्जिदचे सचिव प्रा. आशपाक मकानदार, मरकज मशिदचे प्रमुख कबीर मुल्ला, ट्रस्टी हारुण सय्यद, मदिना मशिदचे प्रमुख मौलाना अजिम पटेल यांनी हे निवेदन दिले.

आजऱ्यात पाच जणांना नोटीस
आजरा ः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज शहरात पोलिस बंदोबस्त तैनात होता. मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान आज दुपारी राममंदिरात महाआरती केली. उपतालुका प्रमुख आनंदा घंटे व महीला आघाडी जिल्हा प्रमुख पुनम भादवणकरसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. पूनम संजय भादवणकर (आजरा), सुधीर रामदास सुपल (लाटगाव), आनंदा आप्पा घंटे, अनिल दत्तु निऊंगरे (मडिलगे) चंद्रकांत सांबरेकर (रा. जेऊर) यांना नोटीस बजावली आहे.

जयसिंगपुरात बंदोबस्त
जयसिंगपूर ः जयसिंगपूर व उदगाव (ता. शिरोळ) येथील प्रार्थना स्थळासमोर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. जयसिंगपूर पोलिसांनी हद्दीतील जयसिंगपूर, उदगांव, उमळवाड, कोथळी, चिपरी, दानोळी, कवठेसार यासह अनेक गावात असलेल्या मस्जिदीसमोर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी कसलाही वाद व अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त लावला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55165 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top