
आरोग्य विभागाकडील ४५
‘आरोग्य’कडील पदोन्नती प्रक्रिया पूर्ण
कोल्हापूर : कोरोना व महापुरामुळे जिल्हा परिषद, आरोग्य विभागातील ४५ कर्मचाऱ्यांच्या विविध संवर्गातील पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. आरोग्य सहायक (महिला) २३, आरोग्य सहायक (पुरुष) १६ व पर्यवेक्षक ६ यांच्या पदोन्नती समुपदेशनाद्वारे केल्या. ही प्रक्रिया पारदर्शी राबविल्यामुळे कर्मचारी समाधान व्यक्त करीत आहेत. संघटना, लोकप्रतिनिधींकडून विचारणा होत होती. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. योगेश साळे यांच्या देखरेखीखाली कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ४५ कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली.
१५२३ १५२२
‘बलभीम’च्या अध्यक्षपदी विनोद पाटील
बोरपाडळे ः माले (ता. पन्हाळा) येथील श्री बलभीम विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी विनोद विलास पाटील तर उपाध्यक्ष म्हणून उत्तम बापू पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी अधिकारी के.एस. ठाकरे यांच्या अधिपत्याखाली निवड झाली. संचालक असे ः संभाजी पाटील, केरबा पाटील, सुहास पाटील, शिवाजी पाटील, कुसुम पाटील, रंजना पाटील, खंडेराव हिरवे, बाबासाहेब माळी, शिवाजी बंडगर. प्रास्ताविक सचिव तानाजी यांनी केले. आभार रामचंद्र घाटगे यांनी मानले.
१२८३
‘इंजाईदेवी’चे दिनकर पाटील अध्यक्ष
तुरुकवाडी ः येथील श्री इंजाईदेवी विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दिनकर गणपती पाटील तर उपाध्यक्षपदी तुकाराम बाळकू हिंदुळकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सागर बलकवडे होते. संचालक असे ः डॉ. एस. एन. पाटील, आनंदराव माईंगडे, सर्जेराव माईंगडे, सरपंच गणपतराव कांबळे, अरुण पाटील, आर. एस. पाटील, डॉ. बाळासाहेब पाटील, के. के. पाटील, सूर्यकांत पाटील. सचिव संजय पेठकर यांनी आभार मानले.
मसाई पठारावर सुविधा पुरवा
पन्हाळा ः सोळा मे रोजी बौद्ध पौर्णिमा आहे. या दिवशी बौद्ध बांधव आणि पर्यटक मसाई पठारावरील बुद्ध लेण्यात पंचशिल ग्रहण करण्यासाठी येतात. या लोकांसाठी लेणी परिसरात प्रशासनाने पाणी, आरोग्यविषयक सुविधा व प्राथमिक नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच म्हाळुंगे ते मसाई पठार रस्ता खराब असल्याने तो दुरुस्त करून घ्यावा, अशी मागणी भारतीय महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
घोटवडे विकास सेवा संस्था बिनविरोध
शाहूनगर ः घोटवडे (ता. राधानगरी) येथील घोटवडे विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी म्हणून युसुफ शेख यांनी काम पाहिले. गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे, राष्ट्रवादीचे नेते संजय डोंगळे, एम. टी. डोंगळे, शंकरराव डोंगळे, अमर डोंगळे, प्रकाश ढेरे, प्रभाकर डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध झाली. संचालक : अभिजित अरुण डोंगळे, संदीप बाळासाहेब डोंगळे, शिवाजी पांडुरंग डोंगळे, कृष्णात आनंदराव डोंगळे, सनिकेत अरुण पाटील, राजेंद्र केरबा डोंगळे, गणपती धोंडिराम डोंगळे, भरत दत्तात्रय डोंगळे, द्रौपदी बळवंत डोंगळे, चंद्रलेखा प्रभाकर डांगे, नेताजी शिवराम कांबळे, वाल्मीक श्रीपती कोळी, संताजी सजना डोंगळे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55167 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..