
आरोग्य विभागाकडील ४५
१५२३, १५२२
‘बलभीम’च्या अध्यक्षपदी विनोद पाटील
बोरपाडळे ः माले (ता. पन्हाळा) येथील श्री बलभीम विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी विनोद विलास पाटील, तर उपाध्यक्ष म्हणून उत्तम बापू पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी अधिकारी के.एस. ठाकरे यांच्या अधिपत्याखाली निवड झाली. संचालक असे ः संभाजी पाटील, केरबा पाटील, सुहास पाटील, शिवाजी पाटील, कुसुम पाटील, रंजना पाटील, खंडेराव हिरवे, बाबासाहेब माळी, शिवाजी बंडगर. प्रास्ताविक सचिव तानाजी यांनी केले. आभार रामचंद्र घाटगे यांनी मानले.
...
१२८३
‘इंजाईदेवी’चे दिनकर पाटील अध्यक्ष
तुरुकवाडी ः येथील श्री इंजाईदेवी विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दिनकर गणपती पाटील, तर उपाध्यक्षपदी तुकाराम बाळकू हिंदुळकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सागर बलकवडे होते. संचालक असे ः डॉ. एस. एन. पाटील, आनंदराव माईंगडे, सर्जेराव माईंगडे, सरपंच गणपतराव कांबळे, अरुण पाटील, आर. एस. पाटील, डॉ. बाळासाहेब पाटील, के. के. पाटील, सूर्यकांत पाटील. सचिव संजय पेठकर यांनी आभार मानले.
...
02933
सुभाष पाटील अध्यक्षपदी
राशिवडे बुद्रुक ः येथील यशवंत विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष विनायक पाटील व उपाध्यक्षपदी नामदेव यशवंत गोंगाणे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीच्या अध्यक्षस्थानी स्वप्नील आगम होते. बिनविरोध संचालक असे : डॉ. जालंदर पाटील, सागर मगदूम, रंगराव लाड, राजाराम चौगले, शशिकांत पाटील, यशवंत पाटील, महादेव गोनुगडे, दीपा पाटील, शकुंतला पाटील, सुर्याप्पा जोंग, दिनकर कांबळे. जालंदर पाटील व सदाशिव ढोणे यांनी मनोगत व्यक्त केले. सी. डी. पाटील, जयवंत पाटील, जयवंत मगदूम, जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, सचिव भिकाजी यादव उपस्थित होते. स्वागत राजेंद्र पाटील यांनी केले. आभार रमेश पाटील यांनी मानले.
...
००७२५, ००७२४
पांडुरंग गायकवाड अध्यक्षपदी
सातवे : आरळे (ता. पन्हाळा) येथील श्रीराम विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी पांडुरंग संपतराव गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी आनंदा मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड समितीच्या अध्यक्षस्थानी आय. सी. देसाई होते. सदस्य शिवाजीराव गायकवाड, राजेंद्र पाटील, शंकर पोवार, लक्ष्मण डवंग, सागर देशमुख, मारुती रणशिंग, राजाराम महापुरे, सुवर्णा गायकवाड, बाळाबाई घाटगे, संस्थापक रामचंद्र गायकवाड, मार्गदर्शक आरळेचे सरपंच संतोष गायकवाड उपस्थित होते. स्वागत क्लार्क शिवाजी घाटगे यांनी केले आभार सचिव प्रकाश खाडे यांनी मानले.
--
01615
दर्शना पाटील हिची निवड
मलकापूर ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी येथील ग. रा. वारंगे ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी दर्शना राजेश पाटील हिची निवड झाली आहे. तालुकास्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून तिने प्रथम क्रमांक मिळविला. तिला प्रा. शिवाप्पा पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. स्पर्धा गोगवे येथे झाली. राजेंद्र सूर्यवंशी, आनंदा पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. गट शिक्षणाधिकारी नंदकुमार शेळके, संस्था सचिव विष्णू पाटील, मुख्याध्यापक ए. पी. पाटील, दीपक लाड, रामशास्त्री तळप आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55167 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..