इचलकरंजी पालिका कर्मचाऱ्यांचा साखर, पेढे वाढून आनंदोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी पालिका कर्मचाऱ्यांचा साखर, पेढे वाढून आनंदोत्सव
इचलकरंजी पालिका कर्मचाऱ्यांचा साखर, पेढे वाढून आनंदोत्सव

इचलकरंजी पालिका कर्मचाऱ्यांचा साखर, पेढे वाढून आनंदोत्सव

sakal_logo
By

19526
इचलकरंजी ः थकीत सहायक अनुदान प्राप्त झाल्याबद्दल कर्मचारी संघटनांच्या वतीने साखर - पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

इचलकरंजी पालिका कर्मचाऱ्यांचा
साखर-पेढे वाटून आनंदोत्सव
इचलकरंजी, ता. ५ ः राज्य शासनाकडून इचलकरंजी पालिकेला ९८ कोटी थकीत सहायक अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सर्व प्रलंबित बिले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रवेशद्वारासमोर साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
पालिका कर्मचाऱ्यांची विविध देय देणी प्रलंबित आहेत. त्यामुळे थकीत सहायक अनुदान मिळण्यासाठी संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते. तर खासदार धैर्यशील माने यांच्यासह याप्रश्‍नी पाठपुरावा करणाऱ्यांचे सर्वांचे या वेळी आभार मानण्यात आले. मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारणी प्रलंबित देणी तत्काळ आदा केली जातील, असे स्पष्ट केले. याप्रसंगी आण्णा कागले, ए. बी. पाटील, शिवाजी जगताप, चंद्रकांत कोठावळे, विजय पाटील, के. के. कांबळे, हरी माळी, धनंजय पळसुले, हरी माळी, शीतल पाटील, नौशाद जावळे, संजय कांबळे, सुभाष मालपाणी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55176 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top