
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
वडरगेत उद्या लावणी स्पर्धा
गडहिंग्लज : वडरगे (ता. गडहिंग्लज) येथील श्री गोसाविनाथ यात्रेनिमित्त राज्यस्तरीय लावणी स्पर्धा होणार आहे. शनिवारी (ता. ७) रात्री नऊला स्पर्धेला सुरुवात होईल. प्राथमिक शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा होईल. आदर्श ग्रुपमार्फत या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे १०००१, ७००१, ५००१, ४००१, ३००१, २००१, १००१ रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आदर्श ग्रुपमार्फत करण्यात आले आहे.
---------------
19527
गडहिंग्लज : सावित्रीबाई फुले विद्यालयातर्फे झालेल्या पोहण्याच्या प्रशिक्षणात सहभागी झालेले विद्यार्थी.
फुले विद्यालयातर्फे पोहण्याचे प्रशिक्षण
गडहिंग्लज : येथील पालिकेच्या सावित्रीबाई फुले विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ४० विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. हिरण्यकेशी नदीघाटावर हा उपक्रम राबविण्यात आला. पाण्याची भीती, पालकांकडे असलेला अपुरा वेळ, खासगी क्लासेसची न परवडणारी फी यामुळे मुले-मुली पोहण्यापासून वंचित राहतात. याचा विचार करून सावित्रीबाई फुले विद्यालयामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या शैक्षणिक वर्षाची अंतिम परीक्षा संपल्यानंतर १८ एप्रिलपासून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. सकाळी नऊ ते अकरा या कालावधीत हे प्रशिक्षण सुरू होते. मुख्याध्यापक विठ्ठल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भगवंता कांबळे, अनिल खोपकर, संदीप बाबर, अश्विन नाईक यांनी विद्यार्थ्यांना पोहण्याचे धडे दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55185 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..