
परशुराम जन्मोत्सव
19529
भगवान परशुराम जन्मोत्सव
सोहळा शहरात उत्साहात
कोल्हापूर, ता. ५ ः अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि चित्पावन संघाच्या संयुक्त विद्यमाने अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर भगवान परशुराम जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, श्री बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात झाली. त्यावेळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
पालखी सोहळ्याचा प्रारंभ यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते झाला. यावेळी पुरोहित आघाडी व महिला आघाडीचे सदस्य पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामराव जोशी, चित्पावन संघाचे अध्यक्ष नंदकुमार मराठे, पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, केदार जोशी, प्रसाद भिडे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विवेक जोशी, के. रामाराव, सरोज फडके, श्री महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर, उदय महेकर, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, उमा कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, डॉ. अभिजित तगारे, देवीदास सबनीस, सुधीर सरदेसाई, मिलिंद पावनगडकर, प्रसाद कुलकर्णी, लालासाहेब गायकवाड, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, महेश उरसाल, राजू सासने तसेच ब्राह्मण समाजातील सर्व संघटना, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55190 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..