मनपा कर्मचारी पगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा कर्मचारी पगार
मनपा कर्मचारी पगार

मनपा कर्मचारी पगार

sakal_logo
By

मनपा कर्मचाऱ्यांचा
५ तारखेलाच पगार

प्रशासनाने दिला सुखद धक्का

कोल्हापूर, ता. ५ ः जवळपास वर्षभरापासून प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेनंतरच होणारा पगार या महिन्यात मात्र आज जमा करून महापालिका प्रशासनाने कायम कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला. एक तारखेच्या आत हा पगार जमा व्हावा, असे नियोजन आहे; पण गेले वर्षभर ते विस्कळीत झाले आहे.
कोरोना काळानंतर सर्व व्यवहार सुरू झाल्यानंतर जवळपास वर्षभरापासून महापालिकेतील कायम कर्मचाऱ्यांचे पगार ठरलेल्या तारखांना होत नाहीत. २६, २८, ३०, १ अशा तारखांना कायम कर्मचाऱ्यांचे, तर ७ तारखेला रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार केले जाणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात १० तारखेनंतरच कायम कर्मचाऱ्यांचे, तर त्यानंतर रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार होत होते. महापालिका कर्मचारी संघाने विविध मागण्यांबरोबर पगार वेळेवर करण्याबाबतच्या मागणीवरूनही संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध देणी तसेच सेवानिवृत्तांची देणी देण्यास सुरुवात केली आहे.
एप्रिलचा मे महिन्यात होणारा पगार प्रशासनाने आज जमा केला. त्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना सुखद धक्काच बसला आहे. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने पगार वेळेवर होत नाहीत, पुढे ते होतील की नाही, अशी भीती बाळगणारे कर्मचारी या निर्णयामुळे खूश झाले आहेत. रोजंदारी कर्मचाऱ्यांचाही पगार लवकर होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55203 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top