रांगोळी सेवा सोसायटीमध्ये सत्ताधारी गटाला सर्व जागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांगोळी सेवा सोसायटीमध्ये सत्ताधारी गटाला सर्व जागा
रांगोळी सेवा सोसायटीमध्ये सत्ताधारी गटाला सर्व जागा

रांगोळी सेवा सोसायटीमध्ये सत्ताधारी गटाला सर्व जागा

sakal_logo
By

रांगोळी सेवा सोसायटीमध्ये
सत्ताधारी गटाला सर्व जागा
रांगोळी, ता. ५ : येथील रांगोळी विकास सेवा सोसायटीमध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व जागा जिंकत सत्ता राखली. यापूर्वीच सत्ताधारी गटातील चार उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर सर्वसाधारण गटातील १२ व अनुसूचित जाती जमाती एका जागेसाठी निवडणूक झाली.
अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत पुन्हा सत्ताधारी पॅनेलने एकहाती सत्ता मिळवत १३ पैकी १३ जागा जिंकल्या. बिनविरोध झालेले उमेदवार असे : महिला राखीव - प्रमिला बापू कमते, सुवर्णा सदाशिव मोरे. इतर मागासवर्गीय निवास तुकाराम शिंगे. भटक्या विमुक्त जाती/जमाती - किरण सुरेंद्र शिंगाडी. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण गट - तानाजी लक्ष्मण सादळे (८४४), दादासो बाळासो पाटील (८५५), नबीसो लतिफ मुल्लाणी (७५०), चंद्रकांत सुरेंद्र पाटील (७९७), चंद्रकांत आप्पासो देसाई (८५१), राजगोंडा तातोबा पाटील (८२२), अनिल सुरेंद्र शिरोळकर (८११), कृष्णा राऊ सादळे (८०२), बंडोपंत रवींद्र सादळे (७९७), तानाजी दत्तू कुरणे (७५०), सुनील रघुनाथ आळगुंडे (७७८), वैशाली विक्रम मोरे (७८५). अनुसूचित जाती/जमाती - अशोक धोंडिबा बेनाडे (७४३).
सोसायटीमध्ये केलेला पारदर्शी कारभार व आमच्या सर्व संचालक मंडळावर सभासदांनी विश्‍वास दाखविलेचे तानाजी सादळे यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रगती बागल यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांसह समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55219 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top