इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त बातम्या
इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

19626
आदित्य चौगुले , अनिशा निकम


कबड्डी स्पर्धेसाठी जिल्ह्याचे संघ जाहीर
इचलकरंजी : पुणे येथील बाणेर येथे होणाऱ्या कुमार व कुमारी गट कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे संघ जाहीर करण्यात आले आहेत. मुलींच्या संघाचे संघनायक म्हणून अनिशा निकम व मुलांचा संघनायक म्हणून आदित्य चौगुले याची निवड केली. या निवडी जिल्हा असोसिएशनचे सचिव प्रा. संभाजी पाटील, कार्याध्यक्ष रमेश भेंडीगिरी यांनी केल्या. असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी पार पडल्या. कुमारी गट संघ असा, अनिशा निकम, ऋतुजा अवघडी, प्रांजल पवार, आदिती माने, अंकिता चेचर, बंदीनी पाटील, निशीगंधा गुरव, प्रतीक्षा पाटील, गौरी शिरगुरे, निरजला बोदे, समीक्षा साळवी, समीक्षा डोंगरे, संघ प्रशिक्षक प्रा. आण्णासाहेब गावडे, व्यवस्थापक प्रा. चंद्रशेखर शहा. कुमार गट- आदित्य चौगुले, तेजस पाटील, साईप्रसाद पाटील, वैभव राबाडे, आदित्य पोवार, दादासो पुजारी, ओमकार पाटील, कुणाल जगताप, धनंजय भोसले, स्वराज्य साळवी, पृथ्वीराज चव्हाण, तुषार बरेगे, संघ प्रशिक्षक अमित संकपाळ, संघ व्यवस्थापक शहाजहान शेख.
--------------
19579
इचलकरंजी : आपटे वाचन मंदिरात बाल वाचन संस्कार शिबीराच्या समारोप समारंभात बोलताना संजय शिरगावे.

बाल वाचन संस्कार शिबिराचा समारोप
इचलकरंजी : आपटे वाचन मंदिरात बाल वाचन संस्कार शिबिराचा समारोप झाला. कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिबिराचे यंदाचे हे १६ वे वर्ष असून विविध शाळातील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सात दिवस सुरू असलेल्या या शिबिरात मुलांकडून कथा, कविता, चरित्रे, वृत्तपत्र, विज्ञानविषयक माहिती, नाट्यछटा, बाल नाटिका आदींचे वाचन करून घेण्यात आल्या. शिबिराची भूमिका ग्रंथालयाच्या कार्यवाह माया कुलकर्णी यांनी मांडली. शिबिरार्थीची सामान्यज्ञान परीक्षा घेण्यात आली. शिबिराचा समारोप पुस्तक हंडीने करण्यात आला. सहभागी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. या वेळी हर्षदा मराठे, डॉ. कुबेर मगदूम, ॲड. स्वानंद कुलकर्णी, काशिनाथ जगदाळे, प्रा. सुजित सौंदत्तीकर, प्रा. मोहन पुजारी, प्राजक्ता कुलकर्णी, संपदा ओगले, राजेंद्र घोडके, बापू तारदाळकर आदी उपस्थित होते.
------------
‘रोटरी’तर्फे महिलांसाठी शिबिर
इचलकरंजी : रोटरी क्लब सेंट्रलतर्फे महिलांसाठी शिवणकला व फॅशन डिझाईनिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व युवतींसाठी हे प्रशिक्षण असून प्रवेशासाठी वयाची अट नाही. गारमेंट मशिनची माहिती व व्यवसायविषयक मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. हे प्रशिक्षण दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र येथे होणार आहे. महिला व युवतींनी प्रशिक्षणस्थळी ९ मेपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----------
सोहम कुलकर्णीचे यश
इचलकरंजी : डीकेटीई इंग्लिश मीडियम हायस्कूलचा विद्यार्थी सोहम कुलकर्णी याने वर्ड विझ स्पर्धेत यश मिळविले. ही स्पर्धा पुणे येथे क्रिएटिव्ह इंटेलिजन्स डेव्हलपमेंट सिरीजच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. सोहम याने १२० पैकी ११० गुण मिळवून सुपर ॲचिव्हर श्रेणी व रौप्यपदक पटकाविले. या यशाबद्दल मुख्याध्यापिका माला सूद, भारती कासार, वर्ग शिक्षिका असिफा शेख आदींनी त्याचा सत्कार केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55238 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top