गडहिंग्लज शहरासाठी ५५ लाखांचा निधी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज शहरासाठी ५५ लाखांचा निधी मंजूर
गडहिंग्लज शहरासाठी ५५ लाखांचा निधी मंजूर

गडहिंग्लज शहरासाठी ५५ लाखांचा निधी मंजूर

sakal_logo
By

गडहिंग्लज शहरासाठी
५५ लाखांचा निधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : शहरातील विविध विकासकामांसाठी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विशेष रस्ता अनुदान व वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेंतर्गत हा निधी मिळेल. खासदार संजय मंडलिक यांनी निधी मंजुरीसाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला. या निधीतून शहरातील विविध सहा कामे मार्गी लागणार आहेत.
नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून गडहिंग्लज शहरासाठी २५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. लक्ष्मी मंदिर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज बांधणे (सहा लाख रुपये), संकेश्‍वर रोडवरील सिद्राम पाटील कॉलनी येथील ओपन स्पेस विकसित करणे (पाच लाख), अहिल्याबाई होळकर चौक सुशोभीकरण करणे (१४ लाख) ही कामे होणार आहेत; तर विशेष रस्ता अनुदानातून नगर परिषदेला ३० लाख रुपये मंजूर झाले आहेत. यातून नेहरू चौक येथील हनुमान मंदिर परिसरात काँक्रिटीकरण व विठ्ठल मंदिरालगत आरसीसी गटर्स बांधणे (पाच लाख), होरकेरी गल्ली येथील बेल्लद घर ते जोशी घरापर्यंत रस्ता डांबरीकरण व रस्त्याकडेला काँक्रिट गटर्स बांधणे (११ लाख), लाटकर गल्ली येथे गटर्स बांधणे (१४ लाख) ही कामे मार्गी लागणार आहेत.
विकासकामांसाठी हा निधी मंजूर करून घेण्यासाठी माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी, पक्ष प्रतोद बसवराज खणगावे, माजी नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांनी पाठपुरावा केल्याचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55240 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top