कौलगेत एकत्र आले ४७ वर्षांनंतर वर्गमित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौलगेत एकत्र आले ४७ वर्षांनंतर वर्गमित्र
कौलगेत एकत्र आले ४७ वर्षांनंतर वर्गमित्र

कौलगेत एकत्र आले ४७ वर्षांनंतर वर्गमित्र

sakal_logo
By

19592
कौलगे : तब्बल ४७ वर्षांनंतर एकत्र आलेले न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी.

कौलगेत एकत्र आले
४७ वर्षांनंतर वर्गमित्र
गडहिंग्लज, ता. ५ : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी ४७ वर्षांनंतर एकत्र आले. सन १९७५ च्या दहावीच्या बॅचमधील कौलगेसह सरोळी, करंबळी, हिरलगे, जाधेवाडी या गावांतील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्यात आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या शिक्षकांप्रती ऋण व्यक्त केले.
प्रार्थनेने मेळाव्याचा प्रारंभ झाला. मयत गुरुजन व वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिक्षक श्री. चोथे यांचा आप्पा पोवार व विजय तोडकर यांच्या हस्ते, तर श्री पाटील यांचा बबन बारदेस्कर व तानाजी भोईटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सारे वर्गमित्र जुन्या आठवणीत रमले. अरुण आर्दाळकर, विजय तोडकर, शुक्राचार्य पोवार, श्रीकांत पोवार, विजय रावण यांनी मनोगत व्यक्त केले.
चंद्रकांत सुतार, भैरू पाटील, शिवाजी शिंदे, पांडुरंग शिंदे, तानाजी भोईटे, बी. एस. पाटील, दिनकर गुंजाटे, बचाराम पोवार, जयसिंग चव्हाण, सदाशिव खन्ना, विजय ढोणुक्षे, बाळासाहेब तोडकर, भिकाजी वांगणेकर, आनंदा पाटील, वसंत जाधव, श्रीकांत पोवार, आप्पा पोवार, गणपती सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55259 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top