सफाई कामगारांची बदली व्यवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सफाई कामगारांची बदली व्यवस्था
सफाई कामगारांची बदली व्यवस्था

सफाई कामगारांची बदली व्यवस्था

sakal_logo
By

पगारी सफाई कामगारांकडून
पोटकामगारांची नियुक्ती

ई वॉर्ड लोककल्याण संघर्ष समितीचा आरोप; चौकशी करण्याची मागणी

कोल्हापूर, ता. ५ ः महापालिकेतील झाडू व सफाई कामगारांपैकी ३० टक्के कामगार स्वतः कामावर न येता पगारातून अल्प मेहनताना देऊन गरजू लोकांना कामावर पाठवतात. या बदली यंत्रणेमुळे अपेक्षित साफसफाई होत नाही. आरोग्य विभाग व मुकादमांना हे माहीत असूनही दुर्लक्ष होते आहे. या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी, प्रत्येक वॉर्डमधील झाडू व सफाई कामगाराचे नाव व फोटो प्रकाशित करण्याची मागणी ई वॉर्ड लोककल्याण व संघर्ष समितीने आज केली. उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले.
या वेळी ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, ‘‘शहरातील गटर, नाले, रस्ते सफाईसाठी कर्मचारी नेमून त्यांच्याकडून काम करून घेण्याचे काम महापालिकेचे आहे. त्यासाठी नागरिकांकडून कर घेतला जातो. सध्या पालिकेकडे चतुर्थ श्रेणी झाडू कामगारांची संख्या १५२२ आहे. तर सफाई कामगारांची संख्या २४८ आहे. त्यांच्याकडून सफाई केली जात नसल्याने शहरातील घोषित ५० पेक्षा जास्त झोपडपट्ट्यांमध्ये अस्वच्छता ही कामगारांनी नेमलेल्या बदली यंत्रणेमुळे आहे. तसेच कचरा उठाव करण्यासाठी नेमलेल्या संस्थेला ठराविक रक्कम घेण्याची मुभा असताना ते जादा पैसे घेत आहेत. जैवकचरा उठावसाठी वेगळी यंत्रणा असताना नियमित कचरा संकलन करणाऱ्या वाहनातच पैसे घेऊन तो कचरा घेणारी यंत्रणा आहे.’’
यात भर म्हणून कमी असलेल्या कामगारांना महापालिकेत तसेच खासगी ठिकाणी कामाला लावले आहे. त्यामुळे सर्व प्रकरणाचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी समितीने केली आहे. यावेळी आर. के. पोवार, अनिल कदम, बाबा पार्टे, अमर निंबाळकर, दुर्गेश लिंग्रस, अमित अतिग्रे, महादेव पाटील, तुषार आळवेकर, राजन हुल्लोळी, काका पाटील, किशोर माने, ऋतुराज माने, ॲड. सतीश नलवडे, हेमंत करवडे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55288 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top