बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लिपिकासह पत्नीवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लिपिकासह पत्नीवर गुन्हा
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लिपिकासह पत्नीवर गुन्हा

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लिपिकासह पत्नीवर गुन्हा

sakal_logo
By

19635
पाचगाव ः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश गणपतराव सूर्यवंशी यांच्या याच बंगल्याची झडती घेतली.

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी
लिपिकासह पत्नीवर गुन्हा
संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील; ‘लाचलुचपत’ची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील तत्कालीन लिपिकासह त्याच्या पत्नीवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. सतीश गणपतराव सूर्यवंशी (रा. दिंडेनगर हौसिंग सोसायटी, पाचगाव) आणि त्यांची पत्नी अर्चना सूर्यंवंशी अशी त्यांची नावे आहेत. मालमत्तेच्या चौकशीबाबतचे आदेश प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी आज सांगितले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी ः जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात सतीश सूर्यवंशी तत्कालीन लिपिक होते. त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी व्हावी, यासंबधी पोलिस उपायुक्त (लाचलुचपत प्रतिबंक विभाग पुणे) यांच्याकडून कोल्हापूर विभागाला आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सूर्यवंशी यांच्या मालमत्तेची खुली चौकशी पोलिस निरीक्षक नितीन कुंभार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केली. त्यामध्ये ज्ञात उत्पन्नाचे स्त्रोतापेक्षा एकूण १९ लाख ७८ हजार ६६१ रुपयांची असंपदा (बेहिशेबी मालमत्ता) असून त्याचे प्रमाण १७.६८ टक्के असल्याची माहिती पुढे आली. या संबंधीची सर्व चौकशी पूर्ण करून संशयित सूर्यवंशी व त्यांची पत्नीविरोधात सरकारतर्फे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम १३ (१) (ई) सह १३ (२) सह कलम १०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला. दरम्यान, सूर्यवंशी यांच्या पाचगाव येथील घराची व इतर संपादित मालमत्तेची झडती सुरू असल्याचे उपअधीक्षक बुधवंत यांनी सांगितले. श्री. बुधवंत याबाबतचा तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55303 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top