मनपा स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा स्वच्छता
मनपा स्वच्छता

मनपा स्वच्छता

sakal_logo
By

19633
महापालिका, स्वयंसेवी संस्थांकडून स्वच्छता
कोल्हापूर, ता. ५ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त गुरुवारच्या स्वच्छता मोहिमेत एक टन कचरा व प्लास्टिक जमा केले. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविली.
रंकाळा टॉवर ते फुलेवाडी पेट्रोलपंप परिसर, सीपीआर चौक ते व्हिनस कॉर्नर, शाहू मिल चौक ते सायबर चौक, इंदिरा सागर हॉटेल ते कळंबा जेल, डीएसपी चौक ते खानविलकर पेट्रोलपंप, रंकाळा टॉवर ते तांबट कमान, पंचगंगा नदी रोड ते पंचगंगा घाट परिसर, शेंडा पार्क ते सायबर चौक, इंदिरा सागर हॉटेल ते तलवार चौक, व्हिनस कॉर्नर ते मध्यवर्ती बसस्थानक, कावळा नाका ते शिरोली जकात नाका परिसरात स्वच्छता केली. दोन जेसीबी, दोन डंपर, चार ट्रॅक्टर ट्रॉली व दोन टँकर पाणी वापरण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता रमेश मस्कर, नारायण भोसले, बाबुराव दबडे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे, वृक्षप्रेमी वेल्फेअरचे अमोल बुड्डे, अक्षय कांबळे, स्वच्छतादूत अमित देशपांडे, क्रेडाईचे विद्यानंद बेडेकर, स्वरा फाउंडेशनचे प्रमोद माजगांवकर, शिवाजी विद्यापीठ डीओटीचे प्रा. अमोल कुलकर्णी तसेच त्यांचे सदस्य, आरोग्य, पवडी, नगररचना, इस्टेट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

चौकट
शुक्रवारी येथे होणार स्वच्छता
सकाळी सात वाजता फुलेवाडी पेट्रोलपंप ते शिंगणापूर नाका, दसरा चौक ते उमा टॉकीज चौक, केएसबीपी चौक ते मिलिटरी कॅम्प रोड, इंदिरा सागर हॉटेल ते शेंडा पार्क, डीएसपी चौक ते पितळी गणपती, रंकाळा टॉवर ते डी मार्ट रोड, पंचगंगा स्मशानभूमी ते सिद्धार्थनगर कमान, सायबर चौक ते केएसबीपी चौक, तलवार चौक ते नवीन वाशी नाका चौक, मध्यवर्ती बसस्थानक ते कावळा नाका, कावळा नाका ते मिलिटरी कॅम्प रोड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55309 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top