रुईमध्ये विकास कामांचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुईमध्ये विकास कामांचे लोकार्पण
रुईमध्ये विकास कामांचे लोकार्पण

रुईमध्ये विकास कामांचे लोकार्पण

sakal_logo
By

19580
रूई (ता. हातकणंगले) : विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, माणगावचे सरपंच राजू मगदूम, सरपंच करिश्मा मुजावर, अभय काश्मीरे आदी

रुईमध्ये विकासकामांचे लोकार्पण
रुई : येथील साठेनगर परिसरातील पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, माणगावचे सरपंच राजू मगदूम यांच्या हस्ते झाला. आवाडे यांच्या प्रयत्नातून आणि जिल्हा परिषद सदस्या वंदनाताई मगदूम यांच्या फंडातून ही विकासकामे करण्यात आली. यामध्ये अंगणवाडी इमारत, हायमास्ट दिवे बसविणे, म्हैस व शेळी पालन अनुदान, रस्ता खडीकरण-डांबरीकरण, हाफ राऊड गटार, पेव्‍हिंग ब्लॉक आदी कामे झाली आहेत. या सर्व कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. तसेच उर्वरित विकासकामांचा प्रारंभ या वेळी मान्यवरांच्या हस्ते झाला. याप्रसंगी सरपंच करिष्मा मुजावर, उपसरपंच युनूस मकानदार, ग्रामसेवक विठ्ठल कांबळे, ग्राम पंचायत सदस्य अशोक आदमाने, सदस्या शालाबाई साठे, जवाहर साखर कारखान्याचे संचालक अभय काश्मीरे, सुभाष चोगुले, पद्मना हेरवाडे, बाबासो हुपरे, जिवंधर बलवान, इम्रान मुजावर, संतोष पोवार, अनिल साठे, रोहित पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55310 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top